Horoscope Today 8 August 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 8 ऑगस्ट 2025, आजचा वार शुक्रवार आहे. हा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाल पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज जोडीदाराच्या कला कलाने घ्यावे लागेल, नोकरी व्यवसायात बौद्धिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या विनयशील मनमिळाऊ स्वभावामुळे आतापर्यंत बरीच पडलेली कामे मार्गी लावाल.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज ज्या ठिकाणी काम करता तेथे डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे लागेल, खूप काम करूनही नोकरीमध्ये वरिष्ठांची मनमानी सहन करावी लागेल
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज डोके शांत ठेवण्याव्यतिरिक्त तुमच्या हातात काही राहणार नाही, व्यवसायात बारकाईने सर्व गोष्टींचे निरीक्षण करून निर्णय घ्या
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल, घरामध्ये बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घालावी लागेल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज विद्यार्थ्यांनी इतर ठिकाणी जास्त लक्ष न देता, अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे महिला योग्य विचार करून पावले टाकतील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज सुसंधीचे सोनेरी क्षण वेचायला तुमची बुद्धी सक्षम असल्यामुळे, तुम्ही कशाचीच पर्वा करणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज कोणतीही गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कोर्टकचेरीबाबत चालणारे खटले थोडेसे त्रास देतील, कुटुंबातील व्यक्तींच्या वागण्यामुळे थोडा मनस्ताप संभवतो
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो पूर्वीच्या गोष्टी करण्याचे तुम्ही टाळत होतात, त्याच गोष्टी करण्याकडे तुम्ही पुन्हा उत्सुक व्हाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज तुमच्या एकंदरीत स्वभावामुळे ज्या गोष्टीमुळे लाभ मिळतं ती गोष्ट तुम्ही करालच, पण काम करण्यासाठी पडलेले कष्ट तुम्ही चिकाटीने पेलाल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज तुमच्या बुद्धीला शांत विचारीपणाची झालर असेल, व्यापारात नफा मिळण्यासाठी हे धोरण उत्तम उपयोगी पडेल.
हेही वाचा :
Numerology: श्रावणात भोलेनाथांना प्रिय 'या' जन्मतारखेच्या लोकांची लॉटरी! संकट आपोआप टळेल, वर्षभर कशाचीही कमी नसेल, अंकशास्त्रात म्हटलंय..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)