Weekly Horoscope 11 To 17 August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा (11 ते 17 ऑगस्ट) लवकरच सुरु होणार आहे. सध्या श्रावण महिना देखील सुरू आहे. या आठवड्यात मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मिथुन राशीच्या लोकांनो तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने संवाद साधा, मनात काहीही ठेवू नका. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याचा शेवट या बाबतीत शुभ राहील.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत हा आठवडा उत्तम आहे, भाषण आणि सादरीकरणाच्या शैलीचा चांगला फायदा होऊ शकतो. ऑफिसमधील एखादा प्रकल्प तुम्हाला प्रसिद्धी देऊ शकतो. वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होऊ शकतात. कोणाच्या तरी प्रभावाखाली निर्णय घेणे टाळा.  

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत आठवडा आर्थिकदृष्ट्या संतुलित राहील. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची चिन्हे आहेत. वाया घालवलेल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे असेल. नवीन आर्थिक प्रकल्पात हात घालण्यापूर्वी सर्व पैलू तपासा. आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आरोग्य सामान्य राहील, परंतु मानसिक थकवा आणि निद्रानाशाच्या समस्या उद्भवू शकतात. जास्त विचार आणि व्यस्त दिनचर्येमुळे डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जास्त पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या. मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनपासून दूर रहा.

कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तुमची लव्ह लाईफबद्दल बोलायचं तर प्रेम संबंधांमध्ये भावनिक बंधन अधिक घट्ट होईल. नातेसंबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकतात. जर एखादा जुना मित्र किंवा प्रियकर तुमच्याशी संपर्क साधत असेल तर सकारात्मकता ठेवा. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा संयम आणि समजूतदारपणाने पुढे जाण्याचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्तन आणि समर्पण कौतुकास्पद असेल, परंतु तुम्हाला आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते. विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आठवडा विशेष कामगिरीने भरलेला असू शकतो. जुना प्रकल्प पुन्हा सक्रिय होऊ शकतो किंवा तुम्हाला मुलाखतीत यश मिळू शकते. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवड्यात मिश्रित परिणाम मिळतील. उत्पन्नाचे स्रोत राहतील, परंतु तुम्हाला काही अनपेक्षित खर्चांनाही सामोरे जावे लागू शकते. घर, वाहन किंवा प्रवासाशी संबंधित कोणत्याही गरजेमुळे खर्च वाढू शकतो. जर तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर त्यातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. विशेषतः मानसिक ताण, पचन समस्या आणि हार्मोनल असंतुलन तुम्हाला त्रास देऊ शकते. पुरेशी झोप घ्या, योग आणि ध्यानाची मदत घ्या आणि आरोग्याशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा :           

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)