Weekly Horoscope 10 To 16 February 2025 : फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा चांगला असणार आहे. या काळात मात्र तुम्ही तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तसेच, जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळेल. तसेच, विद्यार्थ्यांचं अभ्यासात चांगलं मन रमेल. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक असाल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा समाधानाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्गी जे काही काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं समाधान मिळेल. तुमचा कोणावरच राग,रुसवा नसणार. तसेच,इतरांपेक्षा स्वत:च्या मेहनतीवर तुम्ही जास्त लक्ष द्याल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही कुरघोडी जाणवू शकतात. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. या काळात तुमचं वैवाहिक जीवन चांगलं असेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही एकदम प्रामाणिक असाल. या आठवड्यात लवकरच धार्मिक कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उतारांचा असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात देखील तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. यासाठी कोणतेही निर्णय घेताना सावधानता बाळगा. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. विनाकारण कोणवरही विश्वास ठेवू नका. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तसेच, तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला थोडीफार चिंता जाणवेल. समाजात तुमची मान-प्रतिष्ठा वाढलेली दिसेल. मात्र, कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तुमची जिद्दी वृत्ती या आठवड्यात दिसून येईल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार चांगला वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी देखील मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. विद्यार्थ्यांना या आठवड्यात अनेक संधी उपल्ध होतील. नवीन गोष्टी शिकून घ्याल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक