Weekly Horoscope 10 To 16 August 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट (August 2026)महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 10 ते 16 ऑगस्ट असा हा आठवडा असणार आहे. हा महिना अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. त्यामुळे हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.  

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

10 ते 16 ऑगस्ट हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी संमिश्र पण प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची परीक्षा होऊ शकते. संयमाने घेतलेले निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि काही महत्त्वाच्या कामांना गती मिळू शकते. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबत भविष्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळावेत. नोकरदारांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश येईल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. उत्पन्नात वाढ होण्याची चिन्हे आहेत. मात्र मोठी आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.  विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. 

Continues below advertisement

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साहवर्धक ठरू शकतो. नवीन संधींचा लाभ घेण्यासाठी योग्य वेळ आहे. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. विवाहितांना जोडीदारासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. मात्र मोठ्या खर्चाचा निर्णय विचारपूर्वक घ्या. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार किंवा प्रकल्प मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील. मात्र प्रवास करताना विशेष काळजी घ्या.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. संयम आणि नियोजनामुळे अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. जोडीदारासोबत विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळेल. बचतीवर भर दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल.नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी विस्ताराचे नियोजन सुरू करू शकतात. पाठदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. नियमित चालणे आणि हलका व्यायाम फायदेशीर ठरेल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रेमसंबंधात विश्वास वाढेल. जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना चांगली ओळख होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना संयम बाळगा. अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. नोकरीत नवीन प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्तारासाठी अनुकूल वातावरण राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळू शकते.मानसिक तणाव कमी करण्यासाठी योग, ध्यान आणि पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या व्यक्तींसाठी 10 ते 16 ऑगस्टचा आठवडा प्रगती, समाधान आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहितांसाठी नवीन नात्याचे योग निर्माण होऊ शकतात.आर्थिक परिस्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. नोकरीत अपेक्षित यश मिळेल. पदोन्नती किंवा वेतनवाढीबाबत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आरोग्य चांगले राहील. मात्र बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला किंवा अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप