Weekly Horoscope 1 To 7 December 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 वर्षाचा शेवटचा  महिना डिसेंबर (December) आणि डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेकांचे भाग्य बदलणार आहे. कारण या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच, शनिच्या मार्गी (Shani Margi) चालीमुळे अनेकांना लाभ मिळणार आहे.त्यामुळे हा नवा आठवडा अनेक राशींसाठी भाग्यशाली असणार आहे. डिसेंबरचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement


मेष रास (Aries Weekly Horoscope)


आजपासून सुरु होणार आठवडा मेष राशीसाठी लाभदायी असणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, नवीन महिन्याची आणि आठवड्याची सुरुवात असल्या कारणाने आजपासून तु्म्ही नवीन कार्याची सुरुवात करु शकता. या आठवड्यात लांबच्या प्रवासाला जाण्याचा योग जुळून येणार आहे. 


वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)


वृषभ राशीासाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. घरातील वातावरणात काही कारणास्तव तणाव वाढू शकतो. जोडीदाराचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. नियमित योग आणि व्यायाम करणं गरजेचं आहे. 


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


मिथुन राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा सावधानतेचा असणार आहे. कारण या काळात तुमच्या व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आर्थिक बाबतीत थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, संशोधनासाठी जास्त पैसे खर्च करु नका. पार्टनरबरोबर चांगला सुसंगत संवाद साधाल. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


कर्क राशीसाठी आजपासून सुरु होणार आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चढ-उतार जाणवेल. तसेच, घरातील देखील शांतता गमावून बसाल. या काळात तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. कामाच्या निमित्ताने तुमची चिडचिड होऊ शकते. हेल्दी डाएट फॉलो करा.


सिंह रास (Leo Weekly Horoscope)


सिंह राशीसाठी डिसेंबरचा पहिला आठवडा फारसा खास नसणार आहे. या कालावधीत तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. तसेच, तुम्ही घेतलेले निर्णय अनेकदा चुकतील. त्यामुळे तुम्हाला पश्चात्ताप करावा लागेल. यासाठी कोणताही निर्णय घेताना नीट विचार करणं गरजेचं आहे. सिंगल लोकांना पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. 


कन्या रास (Virgo Weekly Horoscope)


कन्या राशीसाठी आजपासून सुरु होणारा आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात नशिबाची तुम्हाला चांगली साथ असेल. नोकरी-व्यवसायात तुम्हाला प्रमोशन आणि धनलाभ मिळू शकतो. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान टिकून राहील. वैवाहिक जीवन आनंदी असेल. भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. 


हे ही वाचा :


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Shani Margi 2025 : शनिच्या मार्गी चालीमुळे आजपासून 'या' राशींचं भाग्य उजळणार; जुलै 2026 पर्यंत या राशी जगतील 'टेन्शन फ्री', शनिचीच कृपा