Pakistani Maulana On Aishwarya Rai: विश्वसुंदरी म्हणून अवघ्या जगभरात ओळखली जाणारी बॉलिवूडची (Bollywood News) सुपरस्टार अभिनेत्री म्हणजे, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai). फक्त देशातच नाहीतर जगभरात ऐश्वर्या रायचे चाहते आहेत. पाकिस्तानातही (Pakistan) ऐश्वर्या रायचे चाहते आहेत. अलिकडेच पाकिस्तानात ऐश्वर्या रायचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला. मोदींसमोरच ऐश्वर्या रायनं मानता आणि एकता यावर भाष्य केलेलं. अशातच आता पाकिस्तानातील एका मौलानानं (Pakistani Maulana) आपल्या देशाची शान असलेल्या विश्वसुंदरीवर एक आक्षेपार्ह्य टिप्पणी केली आहे. 

Continues below advertisement

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय बच्चनबाबत एक विचित्र आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये, पाकिस्तानातला एक मौलाना दावा करतोय की, ऐश्वर्या राय पुढच्या दोन ते चार महिन्यांत त्याला लग्नाचा प्रस्ताव पाठवू शकते. या, तो व्हिडीओत पुढे असंही म्हणतोय की, तो सर्वात आधी ऐश्वर्याला इस्लाम धर्म स्विकारायला सांगणार आणि त्यानंतर तिच्याशी लग्न करणार. मौलानानं पुढे म्हटलंय की, त्यानं आधीच तिच्यासाठी एक मुस्लिम नाव निवडलंय, ज्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पाकिस्तानी धर्मगुरूचा धक्कादायक दावा

व्हायरल होणाऱ्या एका पॉडकास्ट व्हिडीओमध्ये मुफ्ती कवी यांनी सांगितलं की, ऐश्वर्या राय आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांच्यातील संबंध बिघडत आहेत. त्यानं म्हटलंय की, जर दोन्ही जोडीदार वेगळे झाले, तर ऐश्वर्या त्यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवून मेसेज करेल. कवी म्हणाले की, "मी ऐकलंय की, हे जोडपं (अभिषेक आणि ऐश्वर्या) वेगळे होत आहेत... देव न करो, कारण आता मलाच संसार थाटायचाय... पण जर वेगळे झाले तर इंशाअल्लाह, ते दोन ते चार महिन्यांत होईल, त्यानंतर त्यांच्याकडून (ऐश्वर्या रायकडून) मला लग्नाचा प्रस्ताव देखील येईल..." 

ऐश्वर्या रायसाठी निवडलंय मुस्लिम नाव 

स्वप्नात ऐश्वर्या रायकडून लग्नाचा प्रस्ताव येणं, हे त्यानं अल्लाहचा आशीर्वाद असल्याचं सांगितलंय. जेव्हा पॉडकास्ट होस्टनं मुफ्ती कवी यांना विचारलं की, ते बिगर मुस्लिम व्यक्तीशी लग्न करतील का? तेव्हा त्यांनी राखी सावंतचा उल्लेख केला आणि सांगितलं की, तिचं नाव आता फातिमा आहे. त्यांनी आग्रह धरला की, ते सर्वात आधी ऐश्वर्या रायला इस्लाम धर्म स्विकारायला सांगतील आणि नंतर तिच्याशी लग्न करतील. त्यांनी पुढे सांगितलं की, ते सर्वात आधी ऐश्वर्या रायचं नाव बदलून आयेशा राय करतील आणि नंतर तिच्याशी निकाह करतील.

राखी सावंतलाही प्रपोज केलं

बरं, मुफ्ती कवी यांनी अशी विचित्र वक्तव्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, वादग्रस्त धर्मगुरूंनी भारतीय मॉडेल, नृत्यांगना आणि कलाकार राखी सावंतशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी लग्नाची तारीख 14 फेब्रुवारी अशीही जाहीर केली. कवी यांच्या मते, राखी सावंतनं स्वतःच्या लग्नाची तारीख निवडली होती आणि लग्नानंतर ती इस्लामिक पोशाख घालण्यास तयार होती. दरम्यान, राखी सावंतनं त्यांचा प्रस्ताव उघडपणे नाकारला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

इथं एकच जात अन् एकच धर्म; अभिनेत्री ऐश्वर्या रायने नरेंद्र मोदींसमोरच सांगितली व्याख्या, पंतप्रधानांनी वाजवल्या टाळ्या