Weekly Horoscope 07 October To 13 October 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा हा आत्मविश्वासाने भरलेला असेल. या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या खाण्या-पिण्यात बदल करु नका अन्यथा त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असेल. या काळात अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणीही वरिष्ठांचा चांगला पाठिंबा मिळेल. नवीन आठवड्यात तुम्ही एखादा नवीन संकल्प देखील करु शकता. पण तो पूर्ण करण्याची तयारी ठेवा अन्यथा तुमचीच निराशा होईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात अनेक चांगल्या-वाईट गोष्टी तुमच्याबरोबर घडतील. तसेच, देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील. तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. त्यामुळे तुम्ही निश्चिंत असाल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या आठवड्यात तुमच्याबरोबर अनेक छोटी-मोठी संकटं उभी राहतील. या संकटांचा तुम्ही धैर्याने सामना करणं गरजेचं आहे. तसेच, सकारात्मक दृष्टीकोन ठेवणं फार गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी नक्कीच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक ठरणार आहे. या काळात देवी लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या सुख-संपत्तीत भरभराट होईल. तसेच, तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे या काळात पूर्ण झाल्यामुळे तुम्ही खुश असाल.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा असणार आहे. या कालावधीत तुमच्यामध्ये संपत्तीत चांगली भरभराट दिसून येईल. कार्यक्षेत्रात तुमची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळेल.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. या आठवड्यात तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. या आठवड्यात तुमचा मान-सन्मान वाढेल. आपल्या खाण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनचर्या योग्य ठेवा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सरप्राईज गिफ्ट मिळू शकतं.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात अपेक्षित परिणाम मिळतील. करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांसाठी हा आठवडा खूप शुभ ठरणार आहे. तुम्ही बढती किंवा बदलीची योजना आखत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होईल. भागीदारी व्यवसायात तुम्हाला लाभ मिळेल.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
नवीन आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी नवीन संधी घेऊन येईल. या आठवड्यात प्रत्येक कामाबाबतचं तुमचं नियोजन पूर्ण होईल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला मोठी डील मिळू शकते. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. या आठवड्यात तुमचा खर्च वाढेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाने भरलेला असेल. तुमच्या मित्राला मदतीने तुमचं काम पूर्ण होईल. अपेक्षित यश मिळवण्यासाठी आळस सोडून कठोर परिश्रम करावे लागतील. मोठ्या डील करताना काळजी घ्या. पैशापेक्षा खर्च जास्त असू शकतो.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
नवीन आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुम्ही तुमचे मित्र आणि प्रियजनांसोबत आनंदाने वेळ घालवाल. कामामुळे तुम्ही थकलेले राहाल. या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक कामात विशेष लाभ मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
नवीन आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी शुभदायी ठरेल. कोणतेही काम पूर्ण झाल्यानंतर मनामध्ये आनंद राहील. विवाहितांना सासरच्या लोकांकडून विशेष सहकार्य मिळेल. तुम्ही इतर लोकांकडे आकर्षित होऊ शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: