Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : जुलै महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. तसेच,आठवड्याचा मधला आणि शेवटचा दिवस खूप खास असणार आहे. एकूणच तूळ ते मीन राशीच्या (Zodiac Signs) लोकांचा आठवडा नेमका कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)


तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य 


तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जे अनेक काळापासून थांबलेले तुमचे काम आहे ते या दरम्यान पूर्ण होईल. या दरम्यान तुम्ही केलेल्या प्रयत्नांना तुम्हाला यश मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना आठवड्याच्या मध्यात तुमच्यावर जबाबदारी सोपवली जाईल. तुमच्या सामाजिक मान-प्रतिष्ठेत वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या तब्येतीत सुधारणा दिसेल. 


वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य 


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जुलै महि्न्याचा पहिला आठवडा लाभदायक असणार आहे. सुरुवातीचे दिवस आव्हानात्मक असतील. छोटे कार्य करताना देखील जास्त मेहनत करावी लागेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जास्त शारीरिक कष्ट करावे लागतील. 


धनु रास साप्ताहिक राशीभविष्य 


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमची अनेक कामे सहज साध्य होतील. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचे चांगले संबंध बिघडू शकतात. तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. 


मकर रास साप्ताहिक राशीभविष्य 


मकर राशीच्या लोकांची आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. तुम्ही केलेल्या मेहनतीचं समाजात चांगलं कौतुक होईल. तसेच, तुमच्या मान-सन्मानात वाढ झालेली दिसेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काही कामानिमित्त बाहेर जाण्याचा योग आहे. तसेच, वरिष्ठांशी बोलताना तुमच्या वाणीचा जपून वापर करा. वैवाहिक जीवन चांगले राहील. 


कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य 


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा अत्यंत शुभ असणार आहे. या दरम्यान तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल. तसेच, जर तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट द्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकता. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचं आर्थिक उत्त्पन्नात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होतील. 


मीन रास साप्ताहिक राशीभविष्य 


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला आर्थिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. तसेच, ज्येष्ठ व्यक्तीच्या सहकार्याने तुमची अनेक कामे सोपी होतील. कुटुंबाच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या