Weekly Horoscope 01 July To 07 July 2024 : जुलै महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. तसेच,आठवड्याचा मधला आणि शेवटचा दिवस खूप खास असणार आहे. एकूणच मेष ते कन्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांचा आठवडा नेमका कसा असेल जाणून घेऊयात साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope).  


मेष रास साप्ताहिक राशीभविष्य 


मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ असणार आहे. या आठवड्यात तुमची नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील. तसेच, कामाच्या ठिकाणी नवीन संधी निर्माण होतील. आठवड्याच्या सुरुवातीला वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवू शकतात. तसेच, मित्राच्या साहाय्याने उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण होतील. कुटुंबा भौतिक सुखसोयी आणि साधनांमध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. 


वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य 


वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ आहे. या आठवड्यात तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, या आठवड्यात तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल पाहाल. व्यावसायिक दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल असणार आहे.तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. 


मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य 


मिथुन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुम्ही नियोजित केलेल्या कामासाठी तुम्हाला थोडी धावपळ आणि मेहनत करावी लागेल. तसेच, थोडा आर्थिक चणचणीचा देखील सामना करावा लागेल. नवीन आठवड्यात तुम्हाला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा देखील योग जुळून येणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 


कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य 


कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा शुभकारक असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामे वळेत पूर्ण होतील. तसेच, तुम्ही या आठवड्यात फिरायला जाण्याची योजना देखील आखू शकता. तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली दिसेल. तसेच, तुम्हाला एखादं नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असल्यास हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. विद्यार्थ्यांचं देखील अभ्यासात मन रमेल. 


सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य 


सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र असणार आहे. या आठवड्यात कोणतेही काम घाईगडबडीत करू नका. अन्यथा,फायद्याच्या जागी नुकसान होईल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही नियोजित केलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागू शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला काहीसा आराम मिळेल. या काळात तुम्हाला मित्रांचं चांगलं सहकार्य मिळेल. 


कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य 


कन्या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे वाढवायचा असेल तर हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कामाच्या बाबतीत तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचं चांगलं सहकार्य मिळेल. तसेच, उत्पन्नाच्या अनेक संधी निर्माण होतील. तुमच्या जवळच्या व्यक्तीशी तुमचं नातं अधिक घट्ट होताना दिसेल. जोडीदाराबरोबर सामंजस्याने व्यवहार कराल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Weekly Horoscope 01 To 07 July 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक