Vastu Tips For Wall Clock : जगभरातील सर्वां लोकांचे काम घड्याळापासून सुरू होते आणि घड्याळाच्या काट्यावर संपते. त्यामुळे घड्याळाला खूप महत्व आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की वास्तूनुसार जर घड्याळ योग्य दिशेने सेट केले नाही तर त्याचा फटका संपूर्ण कुटुंबाला सहन करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत घराच्या योग्य दिशेला घड्याळ लावणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती आहे ते जाणून घेऊया.
- घराच्या दारावर कधीही घड्याळ लावू नका. कारण त्या घड्याळाखालून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो.
- जेव्हा तुम्ही घरात घड्याळ ठेवता तेव्हा नेहमी पूर्व, पश्चिम आणि उत्तरेकडे दिशा ठेवा. यापैकी एकच दिशा निवडा कारण या दिशा घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याचे काम करतात.
- घड्याळ कधीही दक्षिण दिशेला लावू नका, कारण यामुळे सौभाग्य, धन आणि वैभव येणे थांबते.
- वास्तूनुसार पेंडुलम असलेले घड्याळ अधिक शुभ मानले जाते. हे घड्याळ घराच्या पश्चिम दिशेला ठेवल्याने यशाचे मार्ग खुले होतात.
- घरामध्ये कधीही तुटलेले आणि बंद घड्याळ ठेवू नका, कारण असे घड्याळ दुर्दैव आणि अपयशाचे प्रतीक आहे.
- घड्याळाची वेळ पुढे किंवा मागे ठेवू नका. घड्याळ चुकीचे चालत असल्यास योग्य वेळेशी जुळवा.
- निळ्या, काळ्या आणि भगव्या रंगाचे घड्याळ कधीही निवडू नका. हे घड्याळ अशुभ मानले जाते.
- आकाराबद्दल सांगायचे तर वास्तूनुसार पांढरे, तपकिरी आणि लाल रंगाचे आणि गोल व चौकोनी आकाराचे घड्याळे घालणे शुभ असते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्त्वाच्या बातम्या :