Virgo Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : 6 ते 12 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात बुध ग्रहाचा विशेष प्रभाव दिसेल. कारण बुध मकर राशीत येऊन सूर्याची भेट घेईल. अशा स्थितीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने मकर राशीत बुधादित्य योग तयार होईल. फेब्रुवारीचा हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र आणि आनंददायी राहील. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला शुभ परिणाम मिळतील, तर काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबातील सदस्यांशी संयमाने वागा, तसेच संयमाने काम करा.



भावनांवर नियंत्रण ठेवा
आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. या आठवड्यात महत्त्वाच्या कामात वेळ वाया जाईल. भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे. काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल पण लवकरच त्यावर उपायही सापडेल. मनाची चंचलता थांबवा. इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. करिअरमधील कोणतेही महत्त्वाचे पाऊल यशस्वी होईल.



आरोग्य सांभाळा
फेब्रुवारीच्या या आठवड्याच्या सुरुवातीला कन्या राशीच्या लोकांच्या मनात निराशेच्या काही भावना निर्माण होऊ शकतात. कोणत्याही विशिष्ट कामात तुम्हाला येणाऱ्या अडचणी किंवा निकालात होणारा विलंब यामुळे अजिबात निराश होऊ नका. आठवड्याच्या मध्यात व्यवसायात जास्त धावपळ होऊ शकते, यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही कुठेतरी पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा नवीन कामात सहभागी होऊ इच्छित असाल तर त्याची नीट चौकशी करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. आठवड्याच्या मध्यात आर्थिक जोखमीमुळे नुकसान होऊ शकते. मानसिक अस्वस्थता दिसून येईल. जोडीदाराशी विनाकारण वाद घालू नका. पोटाचे विकार संभवतात. मुलांच्या चिंता सतावेल. मालमत्तेचे वाद टाळा. 



प्रेमसंबंधात असेल गोडवा
या आठवड्यात नवीन विचारांची फुले उमलतील आणि आनंद निर्माण करतील. लाइफ पार्टनरमुळे रोमँटिक आनंद मिळेल, तसेच मानसिक शांती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याबाबत मन चिंतेत राहील. प्रिय जोडीदाराची कठीण काळात साथ मिळेल.



 फायदेशीर करार होण्याची शक्यता
आठवड्याच्या शेवटी एखादा करार यशस्वी होईल. नवीन फायदेशीर करार होण्याची शक्यता आहे. बुद्धिमत्तेत विकास होईल. व्यवसायात नुकसान होऊ शकते. मित्रांकडून अनावश्यक ताण येऊ शकतो. जवळच्या किंवा स्पष्टवक्त्या व्यक्तीच्या विचित्र वागण्यामुळे वाईट वाटू शकते


शुभ रंग- हलका हिरवा
शुभ अंक-1, 5


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Cancer Weekly Horoscope 6 To 12 February 2023 : कर्क राशीच्या लोकांना या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य