Virgo Horoscope Today 23 June 2023 कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने उत्पन्नाच्या काही नवीन संधी मिळतील. आज तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात (Business) यश मिळेल. अविवाहित लोकांना लवकरच शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूप खूश होतील. जवळच्या नातेवाईकांच्या घरी गेल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. तुमच्या वागण्यातही साधेपणा इतरांना फार भावेल. आज मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. त्यामुळे मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरणार आहे.


कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांना आज करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्याची संधी मिळेल. विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांच्या कामात मोठे यश मिळू शकते. परंतु दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल. आर्थिक बाबतीत दिवस फायदेशीर तसेच खर्चिकही असेल. खाद्यपदार्थ, छंद यांसारख्या गोष्टींवर जास्त पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आजचा दिवस चांगला आहे. परदेशातूनही शिक्षण घेण्याची संधी आहे.


कन्या राशीसाठी आजचे कौटुंबिक जीवन


कन्या राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.  आज दूरच्या नातेवाईकांकडून तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. ज्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जे अविवाहित आहेत त्यांना लवकरच शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. लग्नाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहेत. 


आज कन्या राशीचे तुमचे आरोग्य


आज कन्या राशीच्या लोकांना आरोग्याबाबत स्वतःची काळजी घ्यावी लागेल. शरीराच्या वरच्या भागात वेदना जाणवू शकतात. सकाळच्या वेळी थंडी आणि गारवा जाणवेल.


कन्या राशीसाठी आजचे उपाय 


आजच्या दिवशी लक्ष्मी-नारायण स्त्रोताचे पठण करा. आणि गरजूंना दान करा. 


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 23 June 2023 : मेष, वृषभ, तूळसह 'या' राशीच्या लोकांना सावधगिरीचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य