Virgo Horoscope Today 22 April 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरदार लोकांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्ही तुमची रखडलेली कामे पूर्ण करू शकता. तब्येतीत सुरू असलेले चढ-उतार ठीक राहतील. व्यवसाय करणारे लोक व्यवसायाला पुढे नेण्यात यशस्वी होतील. प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. राजकारणात यश मिळेल. ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. थांबलेले पैसे मिळतील. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल.
शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल
सध्या स्पर्धा परीक्षा सुरु आहेत त्यामुळे विद्यार्थी मन लावून अभ्यास करतील. जे युवक स्पर्धेची तयारी करत आहेत, त्यांच्या मेहनतीला यश येईल. तसेच, क्रीडा स्पर्धेत भाग घेणाऱ्यांना विजय मिळेल. शिक्षकांचे सहकार्य मिळेल.
स्वतःला वेळ द्या
आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. मालमत्तेशी संबंधित प्रश्न सुटू शकतात. भौतिक सुखसोयी प्राप्त होतील. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे त्यामुळे स्वत:ला वेळ द्या. जर तुम्ही योग, ध्यान, मॉर्निंग वॉकचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश केला तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले होईल.
वरिष्ठांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमची सर्व कामे करू शकाल. कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्या. यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला तुमच्या मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील.
आज कन्या राशीचे आरोग्य
कन्या राशीच्या लोकांना पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि काही काळाच्या अंतराने विश्रांती घ्या.
कन्या राशीसाठी आजचे उपाय
रामरक्षा स्त्रोत्राचं पठण करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला. वाहत्या पाण्यात काळे तीळ प्रवाहित करा.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ पांढरा आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :