Viprit Rajyog : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनिला (Shani Dev) अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावशाली ग्रह मानतात. शनी देवाला जीवनातील संघर्ष आणि यशाचा कारक ग्रह मानतात. शनी ग्रह जेव्हा संक्रमण करतात तेव्हा प्रत्येक राशीत जवळपास अडीच वर्षांपर्यंत स्थित असतात. त्यामुळेच त्याा प्रभाव दीर्घ काळापर्यंत टिकून राहतो. 

Continues below advertisement

सध्या शनी मीन राशीत स्थित आहे. तर, नोव्हेंबरमध्ये शनि मार्गी केल्यानंतर ऊर्जा अधिक सक्रिय झाली आहे. शनीची मार्गी चाल नवीन वर्षात 2026 मध्ये अनेक राशींवर प्रभाव टाकणारी आहे. कारण या दरम्यान 'विपरीत राजयोग' निर्माण होणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा सहाव्या, आठव्या आणि बाराव्या चरणातील स्वामी या चरणात संक्रमण करतात तेव्हा विपरीत राजयोग निर्माण होतो. हे भाव कर्ज, संघर्ष, परिवर्तनाशी संबंधित आहेत. त्यामुळे या राजयोगाचा कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

सिंह रास (Leo Horoscope)

शनिच्या सहाव्या आणि सातव्या चरणाचा स्वामी आहे. आणि आठव्ा भावात संक्रमण करणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या करिअरमध्ये चांगली प्रगती, प्रमोशन आणि नेतृत्व क्षमता दिसून येईल. या  काळात तुम्हाला शत्रूवर विजय मिळवता येईल. तुमच्या कामातून तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. 

तूळ रास (Libra Horoscope)

शनिच्या सहाव्या चरणात या राशीचा राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुमच्या नोकरीत स्थिरता, उत्पन्नाची नवी साधनं खुली होतील. तसेच, मानसिक तणावातून तुम्हाला मुक्ती मिळेल. आरोग्यात चांगली सुधारणा दिसेल. घरात आनंदाचं वातावरण राहील.  

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लग्न भावात शनि विराजमान आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. तुमच्या जबाबदाऱ्या वाढतील पण त्यातून तुम्हाला समाधान मिळेल. समाजात तुम्हाला मानसन्मान मिळेल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीत पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झालेली दिसेल. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. 

हे ही वाचा :                                                      

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Margashirsha Purnima 2025 : देवी लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय असतात 'या' 5 राशी; मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरु होतील 'अच्छे दिन', घरात सोन्याच्या पावलांनी येणार पैसा