Margashirsha Purnima 2025 Lucky Zodiacs : हिंदू धर्ममान्यतेनुसार, पौर्णिमा तिथीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. प्रत्येक महिन्याची पौर्णिमा ही खासच असते. त्यानुसार आज 2025 वर्षातील शेवटी पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा (Margashirsha Purnima) आहे. आजच्या पौर्णिमा तिथीचं धार्मिक महत्त्व फार आहे. तसेच, मान्यतेनुसार, पौर्णिमा तिथीच्या दिवशी देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो. तसेच, या दिवशी पूजा, पाठ केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदते. 

Continues below advertisement

जेव्हा चंद्र पृथ्वीच्या बरोबर विरुद्ध दिशेला सूर्याच्या समोर असतो तेव्हा पौर्णिमा तिथी लागते. ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व 12 राशींमध्ये काही राशी अशा आहेत ज्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ रास ही पृथ्वी तत्त्वाशी संबंधित रास मानली जाते. या राशीचा स्वामी ग्रह शु्क्र आहे. या राशीचे लोक स्वभावाने शांत, धैर्यशील  आणि आपल्या मेहनतीने पुढे जाणारे असतात. शुक्राच्या प्रभावाने या राशीवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. 

Continues below advertisement

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या रास देखील पृथ्वी तत्वाशी जोडलेली आहे. या राशीचे लोक फार मेहनती, जबाबदारी आणि मिळून मिसळून काम करणारे असतात. यांच्या स्वभावात प्रामाणिकपणा असतो. तसेच, यांचा हेतू फार स्पष्ट असतो. देवी लक्ष्मीची या राशींवर सतत कृपा असते. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ रास ही वायू तत्त्वाशी संबंधित आहे. या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. यासाठीच तूळ राशीचे लोक फार मेहनती आणि संतुलित तसेच न्यायप्रिय असतात. यांच्यात फार कलागुण असतात. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असतो. त्यामुळे या राशीच्या लोकांची प्रगती होते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, कुंभ रास ही वायू तत्वाशी निगडीत आहे. या राशीचे लोक स्वभावाने आत्मनिर्भर, मेहनती आणि समाजाच्या प्रती जबाबदार असतात. यांचे विचार सखोल आणि संतुलित असतात. या राशीच्या लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा असते. या राशीच्या लोकांना त्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळतं. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन रास जल तत्त्वाशी जोडलेली आहे. या राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. या ग्रहाला धनसंपत्तीचा कारक ग्रह देखील म्हणतात. मीन राशीचे लोक स्वभावाने फार दयाळू, भावूक आणि रचनात्मक असतात. या लोकांचं मन फार भावूक असतात. दुसऱ्यांची मदत करण्यात यांना फार आनंद मिळतो. याच गुणांमुळे देवी लक्ष्मी यांच्यावर प्रसन्न होते. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Dev Dhaiyya : 2026 मध्ये 'या' 2 राशींवर घोंगावणार संकटांचं वादळ; शनिच्या ढैय्यामुळे एकामागोमाग येतील आव्हानं, निर्णय घेताना 10 वेळा विचार करा