Vinayak Chaturthi 2024 : आज, म्हणजेच 10 जून रोजी ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi 2024) व्रत आहे. या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे, तसेच या दिवशी उपवास ठेवल्याने विशेष फळ प्राप्त होतं, गणपतीच्या कृपेने सर्व दु:ख दूर होतात.

Continues below advertisement


विनायक चतुर्थीला गणेशाची आराधना केल्याने इच्छित फळ मिळतं. विनायक चतुर्थी व्रत हे महिन्यातून एकदाच येतं. यावेळी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला काही विशेष योग तयार होत आहेत, यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. या शुभ मुहूर्तावर गणपतीची पूजा केल्याने चौपट फळ मिळू शकतं.


विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त (Vinayak Chaturthi 2024 Shubh Muhurta)


हिंदू कॅलेंडरनुसार, चतुर्थी तिथी 9 जून रोजी म्हणजेच, काल दुपारी 3 वाजून 44 मिनिटांनी सुरू झाली आहे आणि ही तिथी 10 जून रोजी, म्हणजेच आज दुपारी 4 वाजून 14 मिनिटांनी समाप्त होईल. विनायक चतुर्थीच्या पूजेची वेळ 10 जून रोजी सकाळी 10:57 ते दुपारी 01:44 पर्यंत असेल.


विनायक चतुर्थी 2024 शुभ योग (Vinayak Chaturthi 2024 Shubh Yog)


आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचं महत्त्व वाढलं आहे.


गणपतीची पूजा करण्याची पद्धत (Ganesh Puja Vidhi)


सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. त्यानंतर प्रसाद म्हणून गणेश मंदिरात एक नारळ आणि मोदक घेऊन जा. बाप्पाला गुलाबाची फुलं आणि दुर्वा अर्पण करा आणि ओम गं गणपतये नमः या मंत्राचा 27 वेळा जप करा आणि अगरबत्ती अर्पण करा. दुपारच्या पूजेच्या वेळी आपल्या घरात आपल्या क्षमतेनुसार पितळ, तांबे, माती किंवा सोन्या-चांदीची गणेशमूर्ती स्थापित करा. यानंतर गणपतीची पूजा आणि आरती करून मुलांना मोदकांचं वाटप करावं.


विनायक चतुर्थी उपाय (Vinayak Chaturthi Remedies)


1. या दिवशीच्या पूजेमध्ये गणपती बाप्पाला दुर्वाची माळ अर्पण करा. त्यानंतर तूप आणि गूळ अर्पण करा. संपत्ती मिळावी किंवा अडकलेले पैसे परत मिळावेत, यासाठी प्रार्थना करा आणि पूजेनंतर हे तूप आणि गूळ गायीला खाऊ घाला किंवा गरजूंना वाटून टाका.


2. जीवनातील कोणत्याही प्रकारचं दुःख आणि संकट दूर करण्यासाठी श्रीगणेशाच्या समोर चतुर्मुखी दिवा लावा. याशिवाय या दिवसाच्या पूजेमध्ये तुमच्या वयानुसार तितके लाडू वापरा. पूजा केल्यानंतर एक लाडू स्वतः खा आणि इतरांना वाटा. याशिवाय भगवान सूर्यनारायणाच्या सूर्यअष्टकाचे 3 वेळा पठण करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : आज सर्वार्थ सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशींना होणार अफाट लाभ, आर्थिक स्थिती उंचावणार