Vidur Niti : महात्मा विदुर हे महाभारतातील मुख्य पात्रांपैकी एक होते. त्यांच्या राजकीय चाणाक्षपणाला तोड नाही. महात्मा विदुर यांनी असे 10 नियम सांगितले आहेत जे जीवन यशस्वी आणि समृद्ध करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात विदुर नीतीचे हे नियम अंगीकारले तर तो कधीही अपयशी होत नाही. विदुर नितीचे हे नियम जाणून घेऊया.
विदुर नीतीच्या या गोष्टी लक्षात ठेवा
विदुर नीतिनुसार वासना, क्रोध आणि लोभ हे नरकाचे द्वार आहेत. या तिघांमुळे माणूस आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. म्हणूनच ते सोडून दिले पाहिजे.
संशय असलेल्या व्यक्तीला कधीही पैसा देऊ नये. कारण अशी व्यक्ती दुसऱ्याच्या पैशाचा योग्य वापर करत नाही.
कोणतेही काम काळजीपूर्वक विचार करूनच सुरू करावे. मनापासून केलेल्या कामातच यश मिळते.
जो माणूस बलवान असतानाही दुर्बलांना क्षमा करतो आणि मदत करतो. अशा व्यक्तीला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो.
जो विश्वासार्ह नाही त्याच्यावर चुकूनही विश्वास ठेवू नये. विश्वासू व्यक्तीवरच विश्वास ठेवा. यामुळे तुम्ही आयुष्यभर यशस्वी व्हाल.
चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहा आणि वाईट कर्म करणाऱ्यांपासून अंतर ठेवा.
जो व्यक्ती आपल्या पंचेंद्रियांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तो कधीच यशस्वी होत नाही.
जो माणूस नेहमी आजारी असतो, त्याच्या आजाराचा शेवट म्हणजे सुखाची प्राप्ती होय.
आळशी व्यक्तीला मदत करू नका. तो कधीही पैसे परत करू शकत नाही.
ज्याला सन्मान मिळाल्यावर आनंद होत नाही आणि सन्मान न मिळाल्यावर राग येत नाही तोच सर्वोत्तम व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला जीवनात यश मिळते.
विदुर नीतीनुसार माणसाचा स्वार्थ त्याला आयुष्यभर दु:ख देत राहतो. त्याला जीवनात सुख-शांती हवी असेल तर त्याग आणि समर्पणाची भावना स्वतःमध्ये ठेवावी लागेल. स्वार्थाचा त्याग केला तर माणसाला आयुष्यात यश मिलाल्याशिवाय राहणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्वाच्या बातम्या