Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, आपल्या घरात ठेवलेल्या वस्तूंचा परिणाम आपल्या जीवनावर होतो. काही गोष्टी घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतात, तर काही घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. वास्तुशास्त्रानुसार,  इतरांकडून घेतलेल्या काही गोष्टी चुकूनही घरात जास्त काळ ठेवू नयेत, अन्यथा घरात गरिबी येऊ शकते. घरात इतरांकडून घेतलेल्या या वस्तू जास्त दिवस ठेवल्यास वास्तू दोष (Vastu Tips) निर्माण होतो, कुटुंबात कलह सुरू राहतात. या वस्तू नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.


घरात चुकूनही ठेवू नका दुसऱ्यांच्या या 4 वस्तू


इतरांचे शूज आणि चप्पल


ज्योतिष शास्त्रानुसार, आपल्या पायांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. त्यामुळे इतरांचे शूज आणि चप्पल परिधान केल्याने त्यांची नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि यामुळे तुमच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे इतरांचे शूज, चप्पल वापरणं टाळावं आणि घरात आणणं टाळावं. दुसऱ्यांचे शूज, चप्पल आपल्या घरात ठेवल्याने त्यांच्या घरातील दु:ख, दारिद्र्य आपल्या घरी चालून येतं.


दुसऱ्यांचे कपडे


बऱ्याचदा आपल्याला एखाद्या फंक्शनला जायचं असेल आणि आपल्याकडे त्याजोगे कपडे नसतील तर आपण इतरांकडून कपडे घेतो. यानंतर हे कपडे लगेच परत करण्यास आपण विसरतो. दुसऱ्यांचे कपडे जास्त काळ आपल्या घरी ठेवल्याने घर कंगाल होतं. घरात पैसा टिकून राहत नाही, म्हणून घरात दुसऱ्यांचे कपडे जास्त काळ ठेवू नये.


इतरांच्या छत्र्या


छत्र्या देखील घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. दुसऱ्याची छत्री घरात आणणं शुभ समजलं जात नाही. काही कारणास्तव दुसऱ्याच्या घरून छत्री आणावी लागली तर ती घरात आणू नका आणि जरी आणली तरी ती लवकरात लवकर परत करा.


जुने फर्निचर


जेव्हा आपण दुसऱ्याच्या घरातून जुने फर्निचर आणतो तेव्हा त्या घरातील सर्व जुनी उर्जा सोबत येते. अशा स्थितीत, हे फर्निचर तुमच्या घरात नकारात्मकता पसरवू शकते आणि तुमच्या आयुष्यात अशांतता निर्माण होऊ शकते. जर काही कारणास्तव तुम्हाला दुसऱ्यांच्या घरातील जुनं फर्निचर आणावं लागत असेल, तर ते दुरुस्त करून त्याला नवीन लूक द्यावा आणि मगच त्या गोष्टी वापराव्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani Gochar 2025 : अवघ्या 3 महिन्यांत शनीचं राशी परिवर्तन; 2025 मध्ये 'या' राशींना होणार जबरदस्त लाभ, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार