Vastu Tips For Lord Lakshmi : वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) घराच्या प्रत्येक कोपऱ्याला विशेष महत्त्व आहे. वास्तूनुसार लक्ष्मी देवी (Lakshmi Devi) त्याच घराला भेट देते. जिथे तिच्या स्थानासाठी स्वच्छता असते. असे मानले जाते की, देवी लक्ष्मीजींना स्वच्छता आणि प्रकाश खूप आवडतो. जे घर स्वच्छ राहते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो.


 


स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. घराचे काही भाग असे आहेत ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण या कोपऱ्यात देवी लक्ष्मी वास करते. हा कोपरा स्वच्छ न ठेवल्यास तुमच्या घरातही गरिबी येऊ शकते. त्याबद्दल जाणून घ्या.


 


घराचे हे भाग स्वच्छ करा


वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात महत्वाचे स्थान मानले जाते. हे देवतांचे विशेष स्थान मानले गेले आहे. 


घराचे स्वयंपाकघर आणि पूजागृह या दिशेला बांधलेले असते.


धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी ईशान्य कोपरा पूर्णपणे स्वच्छ करावा.


घराच्या ईशान्य कोपऱ्यात अनावश्यक वस्तू ठेवू नका.


असे मानले जाते की घराचा ईशान्य कोपरा स्वच्छ असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची कृपा राहते आणि घरात सुख-समृद्धी येते.


घराचा दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे ब्रह्मस्थान. ब्रह्म स्थान हा घराचा मधला भाग आहे.


घराचा हा भाग नेहमी खुला आणि हवेशीर ठेवावा.


ब्रह्मस्थानातील जड फर्निचर काढून टाका आणि येथे अनावश्यक वस्तू ठेवू नका.


घराची साफसफाई करताना घराच्या पूर्व दिशेकडे लक्ष द्या. या दिशेपासून घरात सकारात्मक ऊर्जा येते.


त्यामुळे घराची पूर्व दिशा दररोज स्वच्छ करावी.


घरातील ही ठिकाणे स्वच्छ ठेवल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते.


 


वास्तुशास्त्र म्हणजे नेमके काय? 


वास्तुशास्त्र म्हणजे वास्तूची निर्मिती योग्य पद्धतीने व्हावी यासाठीचे निकष असणारे हे शास्त्र आहे. कारण जीवनात येणारे उतार-चढाव, सुख दुःख हे सगळे वास्तूवरही अवलंबून असते. ब्रह्मांड असेल, नक्षत्रे असतील, ग्रह असतील तर वास्तुशात्रसुद्धा आहेच. प्रत्येक वस्तूचे स्थान काय आहे, ती कुठे असायला पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन वास्तुशास्त्र करते


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


इतर बातम्या


Vastu Shashtra : घड्याळाची दिशाच नाही तर रंग आणि आकाराचाही पडतो प्रभाव, जाणून घ्या घरासाठी घड्याळ कसे असावे?