मुंबई:  ऑक्टोबर 2022 मध्ये जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील भरतीची घोषणा करण्यात आली होती. मात्र नवीन वर्ष सुरु झालं तरी भरतीची कोणतीच तयारी केली नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मुं भरतीचीजाहिरातदेखील प्रसिद्ध झाली नसल्याने विद्यार्थी गोंधळले आहेत. त्यामुळे फक्त घोषणा करून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल आता भरतीची तयारी करणारे विद्यार्थी करत आहेत.


ऑक्टोबर 2022 ला वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यासोबत राज्य शासनाने 21 ऑक्टोबर 2022 रोजी  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासंबंधी 5 संवर्गातील 10,127 पदे भरण्यासंदर्भात निर्णय घेतला.या शासन निर्णयांमध्ये पदभरती संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आलं . मात्र, त्या वेळापत्रकानुसार ना जाहिरात निघाली ना अर्ज भरायच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे खरंच या परीक्षा कधी घेतल्या जाणार? असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. मागील तीन वर्षापासून या परीक्षांची वाट पाहणाऱ्या अनेक उमेदवारांचे वय वाढत चालल्याने याबाबत तात्काळ निर्णयाची अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे. 2019 पासून या ना त्या कारणामुळे पुढे ढकललेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित परीक्षांची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे. नवीन वर्षात शासन निर्णयामध्ये दिलेल्या माहितीनुसार या पदभरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध होणार होती. आता नवीन वर्ष सुरु होऊन दहा दिवस झाले आहे. त्यामुळे दहा हजार पदांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे संबंधित जागांची भरती ही धूळफेक आहे का ? असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधी विचारत आहे


जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधित गट क मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका ,आरोग्य पर्यवेक्षक ,प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता या पाच संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात 21 ऑक्टोबर 2022 रोजी शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. याच शासन निर्णयामध्ये एक विशिष्ट वेळापत्रक देण्यात आले होते. या वेळापत्रकाचे तंतोतंत पालन जिल्हा परिषदांनी करावे व अशा सूचना सुद्धा या शासन निर्णयात देण्यात आल्या होत्या. सोबतच 2019 च्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांनी या जिल्हा परिषदेच्या मार्ग विभागाशी संबंधित रिक्त जागांसाठी अर्ज केले होते. त्यांचे सद्यस्थितीत त्यांचे वय वाढले असल्याने ते जर अपात्र होत असतील तर त्यांना या एका परीक्षेसाठी उमेदवारांचे नुकसान होऊ नये यासाठी वयोमर्यादेच्या अटी सूट देण्यात आली होती. 21 ऑक्टोबर 2022 च्या शासन निर्णयानुसार 31 डिसेंबर 2022 पर्यंत बिंदू नामावली अंतिम करून रिक्त पदांची संवर्गनिहाय आरक्षण निश्चिती करून कंपनीची निवड करणे गरजेचे होते.


तर 1 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार होती.  तर पुढील पंधरा दिवस म्हणजे 8 ते 22 जानेवारी 2023 दरम्यान उमेदवारांचे अर्ज मागविले जाणार होते. त्यानंतर उमेदवारांच्या अर्जाची छाननी करणे, पात्र उमेदवारांची यादी जाहीर करून 25 आणि 26 मार्च 2023 रोजी परीक्षा आयोजन करणे आणि 27 आणि 28 एप्रिल 2023 दरम्यान परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल, असे या वेळापत्रकात नमूद आहे. मात्र,नवीन वर्ष उजाडून दहा दिवस झाले तरी देखील कुठल्याही प्रकारची जाहिरात या पदभरती संदर्भात प्रसिद्ध झाली नाही. आता उमेदवारांची अर्ज मागवण्याची तारीख तर दूरच राहिली. त्यामुळे खरंच शासन निर्णय जारी केलेलं वेळापत्रक कोलमडले आहे का ? जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची भरती नेमकी कधी होणार ? याबाबत स्पष्टता आणावी, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. 


6 जानेवारी 2023 दरम्यान ग्रामविकास विभाग अप्पर मुख्य सचिव यांनी बैठक घेऊन त्यांनी काही सूचना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.  त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदेचे जाहिरात एकाच दिवशी विभाग स्तरावर काढावी व जाहिरात नमुना अंतिम करून जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या आचारसंहिता व इतर बाबी आणि अडचणीचा विचार घेऊन आवश्यक कालावधी ठरवावा असे सांगण्यात आले. सोबतच महसुली विभाग एक कंपनीची निवड, कंपनीची क्षमता व अपेक्षित खर्च ठरवावा, व त्यानुसार एकसमान शुल्क ठरवून पुढील कार्यवाही करावी, असे यामध्ये सांगण्यात आले


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI