Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आढळते. तुळशीला श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. शास्त्रानुसार तुळशीमध्ये लक्ष्मी देवी निवास करते आणि तिची पूजा करणे खूप शुभ असते. ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही शास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख-समृद्धी येते. मात्र, तुळशीचे रोप ठेवण्याचे काही खास नियम आहेत आणि ते पाळले नाहीत तर त्याचा अशुभ परिणाम होतो. जाणून घेऊया तुळशीचे रोप कोणत्या दिशेला ठेवावे.


या दिशेला तुळशीचे रोप लावावे


वास्तूनुसार तुळशीच्या रोपासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. घरामध्ये पूर्व दिशेला जागेची समस्या असल्यास उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.


या दिशेला तुळशीचे रोप ठेवू नका


घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप कधीही लावू नये. दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास अशुभ परिणाम होतात. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्याने घरामध्ये आर्थिक नुकसान होते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ काटेरी रोप कधीही ठेवू नये. तुळशीच्या शेजारी केळीचे रोप लावणे शुभ असते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या