Vastu Tips For Ancestors Photo : हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणेच पूजनीय मानले जाते. याच कारणामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांचा फोटो घरात ठेवतो. जवळपास प्रत्येक घरात पूर्वजांचे फोटो लावलेले दिसतात. घरामध्ये (Home) पूर्वजांचा फोटो लावल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात. तसेच, पितरांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे. फोटो ठेवल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते असे म्हणतात. तसेच, पूर्वजांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता आहे.  


अनेकदा लोक घरातील हॉल, बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजांचा फोटो लावतात. पण, तुम्हाला माहित आहे का की घरात पूर्वजांचा फोटो नेमका कुठे आणि कोणत्या दिशेला लावावा? शास्त्रानुसार (Vastu Shastra) घरामध्ये पितरांचे फोटो ठेवण्याचे काही नियम आहेत. हे नियम जाणून घेणं महत्त्वाचं आहे.चला तर या नियमांबद्दल जाणून घेऊयात.


पूर्वजांचा फोटो कोणत्या दिशेला असावा? 


पूर्वजांचा फोटो लावण्याची सर्वात उत्तम दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. त्यामुळे घरात या दिशेला पूर्वजांचा फोटो लावा. अशा प्रकारे पूर्वजांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल. या दिशेला फोटो लावल्याने घरात सुख-समृद्धी कायम राहते. तसेच पितरांचा आशीर्वादही सदैव राहता अशी मान्यता आहे. 


एकापेक्षा जास्त फोटो नसावेत


अनेकदा लोक आपल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावतात. पण, असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो असं म्हणतात. त्यामुळे, 2-3 पेक्षा जास्त फोटो नसावेत.


घराच्या मध्यभागीही ठेवू नका


ब्रह्म स्थानात म्हणजेच घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो कधीही लावू नयेत. यामुळे मान-सन्मानात तडजोड होते.


फोटो भिंतीवर टांगू नका


अनेकदा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो भिंतीवर टांगतो. शास्त्रानुसार हा त्यांचा अपमान मानला जातो. पूर्वजांच्या फोटोची नेहमी फ्रेम तयार करून शेल्फ किंवा कपाटावर ठेवावीत. यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते. याशिवाय कोणत्याही जिवीत व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला पितरांचे फोटो लावू नयेत. अशाने  व्यक्तीची तब्येत बिघडू लागते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Budh Shukra Asta 2024 : बुध आणि शुक्र ग्रहांचा अस्त; 'या' राशींना मिळतील जबरदस्त लाभ, वेळोवेळी मिळतील शुभसंकेत