Vastu Tips For Hanuman Photo : घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर व्हावा, सुख-शांती नांदावी यासाठी घरात देव-देवतांचे फोटो लावले जातात. यामागे अर्थातच श्रद्धेचाही भाग आहेच. पण, या सगळ्या वास्तूचे (Vastu Tips) काही नियम आहेत ते जाणून घेणं गरजेचं आहे. 


घरात 'या' ठिकाणी चुकूनही हनुमानाचा फोटो लावू नका 


वास्तूशास्त्रानुसार, भगवान हनुमानाचा फोटो तुमच्या बेडरूममध्ये चुकूनही लावू नका. याचं कारण म्हणजे भगवान हनुमान बाल ब्रम्हचारी आहेत. यामुळेच त्यांचा फोटो बेडरूममध्ये लावणं फार अशुभ मानलं जातं. असं केल्याने, व्यक्तीच्या कार्यात बाधा निर्माण होते. तसेच, त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. 


'या' पद्धतीचा फोटो लावा 


हिंदू धर्ममान्यतेनुसार, घरात उडणाऱ्या स्वरूपात असलेल्या हनुमानाचा फोटो लावल्याने व्यक्तीच्या जीवनात त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होतात. त्यामुळे तुमच्या घरात असा फोटो नक्की लावा. जीवनात विश्वास, साहस आणि बळ हवं असेल तर हनुमानाचा पर्वत उचलतानाचा फोटो लावा. मान्यतेनुसार, अशा पद्धतीचा फोटो लावल्याने साहस मिळण्यास मदत होते. 


वास्तूशास्त्रानुसार, घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो लावणं फार शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार, हनुमानाचा या पद्धतीचा फोटो लावल्याने कुटुंबातील सदस्यांवर कोणत्याच प्रकारचं संकट येणार नाही. 


'या' दिशेला लावा भगवान हनुमानाचा फोटो 



  • घरात भगवान हनुमानाचा फोटो दक्षिण दिशेने लावणं शुभ मानलं जातं. तसेच, हनुमानाचं स्वरूप बैठ्या स्वरूपात असावं. असं केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव राहत नाही. 

  • वास्तूनुसार, हनुमानाची मूर्ती किंवा फोटो घराच्या दक्षिण दिशेला ठेवावा. ही दिशा शुभ मानली जाते. या दिशेला फोटो लावताना हनुमानाची बसलेल्या स्थितीत असावी. हे लक्षात घ्या. असे केल्याने घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात. 

  • वास्तूशास्त्रानुसार, बेडरूममध्ये हनुमानाची मूर्ती ठेवणं शुभ नाही. यामुळे वास्तूदोष होऊ शकतो. 

  • वास्तूच्या नियमांनुसार, हनुमानाच्या फोटोच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्या फोटोची रोज पूजा करावी. तसेच, मंगळवारी सुंदरकांड पाळावे. 

  • याशिवाय वाईट शक्तींपासून मुक्ती मिळविण्यासाठी घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर असलेल्या स्थितीत हनुमानाचा लाल रंगाचा फोटो लावू शकता. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Planet Transit in July 2024 : जुलै महिन्यात ग्रहांचा 'चौकार', एक, दोन नाही तर तब्बल चार ग्रहांचं होणार संक्रमण, कोणत्या राशीला मिळणार पुण्य? जाणून घ्या