Vastu Tips For Cat : आपल्यापैकी अनेकजण घरात कुत्रा, मांजर, पोपट, ससा, पक्षी असे अनेक पाळीव प्राणी-पक्षी अगदी आवडीने पाळतात. यामध्ये अनेकांच्या घरी अगदी सहज मांजर आढळते. अनेकदा आपण पाहिलं आहे की, मांजर (Cat) कोणाच्याही घरी जाऊन तिथे बसते. अनेकदा मांजर घरात तिच्या पिल्लांना देखील जन्म देताना आपण पाहिलं आहे. तसेच, जेव्हा ही पिल्लं मोठी होतात तेव्हा ती त्यांना घेऊन जाते. काही जणांसाठी ही फक्त एक सामान्य घटना आहे. पण, वास्तू शास्त्रानुसार (Vastu Tips), पाहिल्यास याचा वेगळा अर्थ देखील आहे. 

Continues below advertisement


असं म्हणतात की, मांजरांनी जर एखाद्या घरात जन्म घेतला तर ती व्यक्ती मालामाल देखील होऊ शकते तसेच कंगालही होऊ शकते.  


घरात मांजर येण्याचा अर्थ काय?


वास्तूशास्त्रानुसार, जर एखाद्याच्या घरात सोनेरी रंगाची मांजर आली तर त्या घराचं लवकरच भाग्य उजळेल असा याचा अर्थ लागतो. तसेच, मांजर घरात आल्याने सौभाग्य येतं. कुटुंबाची चांगली प्रगती होते. घरात पैशांची भरभराट होते. तर, तपकिरी रंगाची मांजर आल्यास तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतात. तसेच, अचानक पैशांची आवक वाढते. 


घरात मांजरांच्या पिल्लांनी जन्म घेतल्याचा अर्थ काय? 


वास्तू शास्त्रानुसार, जर तुमच्या घरी मांजर येऊन जर तिने पिल्लांना जन्म दिला तर ते फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, पिल्लांच्या जन्माच्या 90 दिवसांच्या आत कुटुंबात प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. मांजरीच्या पिल्लांच्या जन्मामुळे घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते. तसेच, यामुळे कुटुंबावर देखील चांगला सकारात्मक परिणाम होतो. 


मांजरीने हा संकेत दिल्यास सतर्क व्हा 


सर्वसामान्य मान्यतेनुसार, जर एखादी मांजर अचानक तुमच्या घरात येऊन जर रडत असेल तर काहीतरी अघटित घडणार आहे हे समजून जा. घरात मांजरीचं रडणं अशुभ मानलं जातं. अशा वेळी घाबरुन न जाता भगवान हनुमानाचा जप करावा. तसेच, प्रत्येक मंगळवारी मंदिरात जाऊन प्रसाद वाटावा. 


मांजर घरात पाळणं शुभ की अशुभ?


वास्तू शास्त्रानुसार, घरात मांजरांचं येणं देखील जरी शुभ असलं तरी मात्र, घरात मांजर पाळणं एक प्रकारे अशुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते असं म्हणतात. यामुळे पैशांची आवकही होत नाही तसेच आरोग्य देखील चांगलं राहत नाही. मात्र, हा अंदाज खरा ठरेलच असं सांगता येत नाही. 


हे ही वाचा :


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


Sankashti Chaturthi 2024 : श्रावणात महिन्यात कधी आहे संकष्ट चतुर्थी? नोट करा पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त