Vastu Tips : आपल्यापैकी जवळपास दिवसातून किमान दोन ते तीन वेळा पीठ मळतात. पण, ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे की, पीठ मळताना काही केलेल्या चुका फक्त व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण कुटुंबावर भारी पडू शकतात. जरी या चुका तुमच्याकडून नकळत झाल्या असतील तरी संपूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती, प्रगती, आरोग्य आणि वैवाहिक जीवनावर याचा नकारात्मक परिणाम भोगावा लागू शकतो. 


वास्तू शास्त्रात, या संदर्भात काही नियम सांगण्यात आले आहेत. जर या नियमांचं योग्य पद्धतीने पालन केलं जात असेल तर व्यक्तीला अधिक लाभ मिळतो. अन्यथा तुमच्या संकटाचं हे कारण देखील ठरु शकतं. 


पीठ मळताना चुकूनही 'या' चुका करु नका


वास्तू शास्त्रानुसार, किचनमध्ये चपातीसाठी पीठ मळताना या गोष्टीची काळजी घ्या की कधीही ते जास्त वेळ मळून ठेवू नका. तसेच मळलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवून त्याचा वापर करु नका. यामुळे कॅन्सरसारख्या आजाराला तुम्ही बळी पडू शकता. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठामुळे तुम्हाला गरीबीचा सामना करावा लागू शकतो. तसेच, घरात नकारात्मकता वाढते. 


त्याचबरोबर तुमचं स्नान झाल्यानंतरच जेवण बनवण्याची तयारी करा. त्याचप्रकारे पीठ देखील तुमचं स्नान झाल्यानंतरच मळा. तसेच, पीठ मळण्यासाठी लागणारं पाणी हे तांब्याच्या भांड्यांमध्ये घ्या. असं केल्याने घरात बरकत टिकून राहील. तसेच, पीठ मळल्यानंतर उरलेल्या पाण्याला फेकून देऊ नका तर हे पाणी झाडा-झुडुपांत घाला.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : वृश्चिक राशीतून ढैय्याचा प्रभाव हटताच 'या' राशींचं नशीब उजळणार; अनेक स्त्रोतातून होणार धन-संपत्तीचा वर्षाव