Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार, घरातील वातावरण नेहमी सकारात्मक असलं पाहिजे, तरच तुमच्या घरात लक्ष्मी टिकते. घरातील छोट्याहून छोट्या नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेचा परिणाम तुमच्या जीवनावर पडत असतो. जर तुम्ही घर व्यवस्थित ठेवलं, सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या गोष्टी घरात ठेवल्या, तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या जीवनावर पडतो. त्याच प्रमाणे, तुम्ही घरात नकारात्मकता पसरवणाऱ्या गोष्टी ठेवल्या तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या जीवनावर पडतो.


तुमची आर्थिक प्रगती ही विशेषत: तुमच्या वास्तूवर आणि तुमच्या घरातील वातावरणावर अवलंबून असते. वास्तुशास्त्रात (Vastu Tips) घराशी संबंधित अशा काही सवयी सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या उत्पन्नावर होतो. या अशुभ सवयींमुळे लक्ष्मी देखील नाराज होते आणि घरात पैसा टिकत नाही. नेमकं कोणत्या गोष्टींमुळे घरात लक्ष्मी येत नाही? जाणून घेऊया.


'या' वाईट सवयी तुम्हाला करतील कंगाल


किचनमध्ये पडलेली खरकटी भांडी


जेवल्यानंतर खरकटी भांडी जास्त वेळ स्वयंपाकघरात ठेवू नये. जेवल्यानंतर ही भांडी लगेच धुवून पुन्हा त्यांच्या जागी ठेवण्याचा प्रयत्न करा. रात्रीची भांडी सकाळी धुण्याची अनेकांना सवय असते, परंतु या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येते, त्यामुळे तुम्ही कधीही किचनमध्ये खरकटी भांडी ठेवू नका. या सवयीमुळे राहू-केतूचाही अशुभ परिणाम तुमच्यावर पडतो आणि घरात कधी लक्ष्मीही टिकत नाही.


पलंगावर मळालेल्या किंवा फाटलेल्या चादरी वापरणं


तुम्ही झोपता त्या पलंगावर कधीही घाण ठेवू नका. फाटलेल्या किंवा मळालेल्या बेडशीटमुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि त्याचा वाईच परिणाम तुमच्या जीवनावर होतो. सकाळी उठल्याबरोबर बेड ठीक केला पाहिजे. अंथरुण काढून बेडवर नीट चादर पसरवली पाहिजे. खराब आणि मळालेली चादर किंवा बेडशीट तुमच्या घरात गरिबी आणते.


देव्हारा अस्वच्छ ठेवणं


दररोज पूजा करण्याआधी देव्हारा स्वच्छता करा, यामुळे तुमच्या घराची प्रगती होते आणि देवी लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते. तुम्ही देवाची रोज पूजा करत नसला तरी घरातील देव्हाऱ्यावर कधी धूळ साचू देऊ नका. यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता राहते आणि तुम्ही नेहमी मानसिक तणावात राहता, तुमचं आर्थिक नुकसान देखील होत राहतं.


शूज, चपला इकडे तिकडे फेकणं


अनेकांना शूज इकडे तिकडे फेकण्याची सवय असते. आपल्या चपला अस्तव्यस्त ठेवण्याची ही सवय तुमच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा आणू शकते. विशेषत: शूज कधीही मुख्य दरवाजाजवळ ठेवू नका, यामुळे घरात लक्ष्मी येण्यास अडथळा निर्माण होतो. शूज नेहमी रॅकमध्ये किंवा शू कपाटात ठेवा.


जेवल्यानंतर ताटातच हात धुणं


जेवल्यानंतर ताटातच हात धुवू नका, असं केल्याने तुम्हाला नशिबाची साथ मिळत नाही. तुमच्या हातात पैसा टिकत नाही. जेवल्यानंतर पहिलं ताट किटनमध्ये ठेवा आणि त्यानंतर बेसिनमध्ये किंवा बाथरूममध्ये हात धुवा. भांड्यातच हात धुतल्याने तुमची आर्थिक स्थिती खालावते. यामुळे तुमचं आरोग्यही बिघडू लागतं, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या घरात समृद्धी हवी असेल तर ही सवय आताच सोडा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Limbu Mirchi Totka : दर शनिवारी दाराबाहेर लिंबू मिरची का लावली जाते, श्रद्धा म्हणायचं की अंधश्रद्धा?


Vastu Tips : घरात किंवा घराच्या आवारात लावा 'ही' 5 रोपं; कधीही भासणार नाही पैशाची कमी