Valentines Day Astrology : फेब्रुवारी (February 2023) महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. प्रेमात असणाऱ्या जोडप्यांसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो आणि या दिवशी हे जोडपे एकमेकांना खूप खास वाटतात. व्हॅलेंटाइन डेच्या आधी व्हॅलेंटाईन वीक म्हणजे प्रेमाचा सप्ताह सुरू होतो. हा आठवडा (Valentine Week) 7 ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालतो. प्रेम व्यक्त करणारे आणि प्रपोज करणारे जोडपे व्हॅलेंटाईन सप्ताहाची आतुरतेने वाट पाहत असतात. या सात दिवसांमध्ये प्रेमाशी संबंधित काही उपाय केल्याने नाते मजबूत आणि दीर्घकाळ टिकते. जाणून घेऊया व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणकोणते उपाय करावेत?
प्रेमाशी संबंधित असलेले ग्रह
ज्योतिषशास्त्राच शुक्र ग्रहाला प्रेमसंबंध, वासना आणि प्रणय यांचा कारक मानले गेले आहे. कुंडलीत शुक्र ग्रह बलवान असेल तर जोडीदारासोबत प्रेम आणि रोमान्स असतो. दुसरीकडे, जर कुंडलीत शुक्राची स्थिती विरुद्ध असेल, तसेच शुक्र कमजोर किंवा पीडित असेल तर राशीच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा पत्रिकेत प्रेम योग असतो तेव्हा लोकांना प्रेम मिळते, परंतु जेव्हा पत्रिकेच प्रेम योग नसतो किंवा ग्रहांची स्थिती कमकुवत असते, तेव्हा अशा लोकांना प्रेम मिळणे कठीण होते. ग्रहांची स्थिती सांगते की, प्रेम तुमच्या नशिबात आहे की नाही.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये काही उपाय केल्यास तुम्हाला प्रेमात यश मिळू शकते. त्याबद्दल जाणून घ्या.
प्रेमात यशस्वी होण्यासाठी टिप्स
ज्योतिषशास्त्रात कुंडलीतील पाचवे घर प्रेमाचे असे सांगितले आहे. जर एखाद्या राशीने पत्रिकेतील आपले पाचवे घर मजबूत केले तर त्याला आयुष्यभर इच्छित जोडीदार आणि प्रेम मिळते. व्हॅलेंटाईन वीकच्या सात दिवसांत तुमचा शुक्र बळकट करण्याचा प्रयत्न करा. शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करा. यासोबतच भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करा. गुरुवारी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करून लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराला गुलाबी रंगाच्या वस्तू भेट द्या.
या मंत्राचा जप करा
वैवाहिक जीवनात रोज भांडणे होत असतील तर शुक्रवारी कामदेव-रतीची उपासना करा. त्यांना प्रसन्न करण्यासाठी 'ओम कामदेवाय विद्याहे, रति प्रियाय धीमही, तन्नो अनंग प्रचोदयात' या मंत्राचा जप करा. यासोबतच तुमच्या जोडीदाराला पूर्ण वेळ द्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या