Tulsi Vivah 2025 : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे, येत्या 2 नोव्हेंबर 2025 रोजी तुळशी विवाह (Tulsi Vivah 2025) साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला तुळशी विवाह साजरा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार आणि धार्मिक श्रद्धांनुसार, तुळशी विवाहाच्या दिवशी अविवाहितांनी योग्य जोडीदार मिळवण्यासाठी किंवा विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी खालील उपाय करणे शुभ मानले जाते. याच संदर्भात डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे ते जाणून घेऊयात.
तुळशी आणि शालिग्राम यांची पूजा :
तुळशी विवाहाच्या दिवशी विधीपूर्वक तुळशी मातेची आणि भगवान शालिग्राम यांची पूजा करा. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप आहेत.
हळदीचा उपाय :
पूजेच्या वेळी तुळशी मातेला आणि शालिग्रामजींना हळदीचा लेप लावावा किंवा हळद मिसळलेले दूध अर्पण करावे. हा उपाय कुंडलीतील गुरू (बृहस्पति) ग्रहाला बळकट करतो, ज्यामुळे विवाहाचे योग लवकर जुळून येतात.
शृंगाराचे सामान अर्पण :
अविवाहित मुलींनी तुळशी मातेला (वधूला) श्रृंगाराचे साहित्य (जसे की लाल चुनरी, बांगड्या, सिंदूर, बिंदी इ.) अर्पण करावे.
गाठ बांधणे :
तुळशी विवाह सोहळ्यादरम्यान, शालिग्रामजींना आणि तुळशीच्या रोपाला पवित्र धाग्याने (मौलीने) एकत्र बांधून गठबंधन करावे.
दिवा लावा :
पूजा झाल्यावर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा (दीपक) लावावा.
उपवास आणि प्रार्थना :
जर शक्य असेल तर तुळशी विवाहाच्या दिवशी उपवास करावा आणि खऱ्या मनाने तुळशी मातेची आणि भगवान विष्णूची आपल्या इच्छित जोडीदारासाठी प्रार्थना करावी.
सूर्यदेवाची पूजा :
तुळशी विवाह पूजा झाल्यावर सूर्यदेवाची देखील पूजा करावी. असे मानले जाते की या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने गुरू आणि सूर्याचे दोष दूर होतात आणि विवाहातील अडथळे दूर होऊन लवकर लग्नाचे योग जुळतात.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :