Tulsi Plant Rules in Marathi : घरातील काही महत्त्वाच्या गोष्टींसाठीचे नियम वास्तुशास्त्रात दिले आहेत. या नियमांचं पालन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. घरातील लोक आनंदाने आणि प्रेमाने एकत्र राहतात. अशा घरावर देवी लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद राहतो. ज्या घरामध्ये रोज तुळशीची (Tulsi) पूजा केली जाते आणि ज्या घरात तुळशीचा मान ठेवला जातो, तिथे नेहमी सुख-समृद्धी नांदते.
पण हेच, तुळशीच्या रोपाशी (Tulsi Plant) संबंधित चुका व्यक्तीला गरीब बनवतात. अशा घरात पैसा कधीच टिकत नाही. घरात दु:ख, समस्या येतात. तुळशीच्या रोपाशी संबंधित नकळत होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजे. तुळशीच्या रोपाशी संबंधित कोणत्या चुका कधीही करू नये? जाणून घेऊया.
तुळशीसंबंधित या चुका टाळा
- वास्तुशास्त्रानुसार, घरातील तुळशीचं रोप नेहमी हिरवंगार असावं. हिरव्या तुळशीच्या रोपामुळे घरात सुख-समृद्धी येते.
- तुळशीचे रोप कधीही सुकू नये. तुळशीचं रोप वाळून जाणं शुभ मानलं जात नाही. वाळलेल्या तुळशीचं रोप घरामध्ये दारिद्र्य, दुःख आणि दुर्दैव आणतं.
- अनेक वेळा तुळशीचे रोप थंडीच्या वातावरणात सुकतं. पुरेशी देखभाल करूनही तुळशीचं रोप पुन्हा पुन्हा सुकलं किंवा विनाकारण सुकलं तर ते मोठ्या आर्थिक नुकसानीचं लक्षण आहे.
- तुळशीचं रोप सुकलं तर नदी किंवा जलाशयात ते विसर्जित करा आणि त्या जागी नवीन रोप लावा. पण वाळलेल्या रोपाला कचरा किंवा अपवित्र ठिकाणी टाकू नका.
- तुळशीच्या रोपाभोवती नेहमी स्वच्छता ठेवा. तुळशीच्या रोपाजवळ घाण, कचरा, झाडू किंवा चपला ठेवणं फारच अशुभ आहे. असं केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होतो आणि घरामध्ये गरिबी येण्यास सुरुवात होते.
- तुळशीच्या रोपाला कधीही घाणेरड्या किंवा अशुद्ध हातांनी स्पर्श करू नका. शूज किंवा चप्पल घालून तुळशीला हात लावू नका किंवा त्यात पाणी टाकू नका.
तुळशीचे फायदे कोणते?
- तुळशीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
- तुळशीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
- तुळस स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते.
- सर्दी आणि खोकल्यामध्ये तुळस खूप फायदेशीर आहे.
- तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते.
- तुळशीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Astrology : डिसेंबरच्या शेवटी शुक्र आणि मंगळ येणार एकत्र; 'या' 5 राशींवर होणार प्रेम-धनाचा वर्षाव