Triekadash Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा शुभ-अशुभ परिणाम दोन्ही दिसतात. ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह (Mercury) एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतात. बुध ग्रह एका राशीत जवळपास 15 दिवसांपर्यंत स्थित असतात. सध्या बुध ग्रह वृश्चिक राशीत विराजमान आहे. या ठिकाणी मंगळ ग्रहाबरोबर युती होणार आहे. या राशीत बुध ग्रह 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या सकाळी 8 वाजून 54 मिनिटांनी बुध आणि यम ग्रह एकमेकांच्या 60 डिग्री अंशावर असणार आहेत. यामुळे त्रिएकादश योग निर्माण होणार आहे. याचा कोणकोणत्या राशींवर शुभ परिणाम होणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी हा काळ फार शुभकारक ठरणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबातील लोकांचे जुन्या प्रोजेक्टवरील मतभेद दूर होतील. नात्यात गोडवा निर्माण झालेला दिसेल. तसेच, समाजात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. मित्रांचा सहवास तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी हा मंगळ आणि बुध ग्रहाच्या युतीचा शुभ योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या शत्रूंवर मात करण्यासाठी बळ मिळेल. मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळू शकते. तसेच, तुमच्या कुटुंबात एखादी शुभवार्ता घडण्याची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला अनेक चांगले अनुभव येतील. 

Continues below advertisement

मकर रास (Capricorn Horoscope)

त्रिएकादश योगामुळे मकर राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडताना दिसतील. या काळात कामाच्या ठिकाणी काही नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. उत्पन्नाचे नवे मार्ग देखील तुमच्यासमोर खुले होतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे चिन्ह आहेत. तसेच, जे तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारी करतायत त्यांना चांगलं यश मिळेल. तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. 

हे ही वाचा :                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 15 November 2025 : आज शनिवारच्या दिवशी 3 राशींवर होणार धनवर्षाव; शनिदेव प्रसन्न होऊन देणार भरभरुन आशीर्वाद; वाचा आजचे राशीभविष्य