Tirgrahi Yog 2023 Vruschik Rashi: प्रत्येक ग्रह विशिष्ट वेळी आपली राशी (Zodiac Signs) बदलतो आणि इतर ग्रहांसोबत मिळून शुभ आणि अशुभ योग तयार होतात. या महिन्यात वृश्चिक राशीमध्ये त्रिग्रही योग तयार होत आहे. वृश्चिक राशीत सूर्य, मंगळ आणि बुध यांची एकत्रित उपस्थिती त्रिग्रही योग निर्माण करत आहे. 5 वर्षांनंतर हे तीन प्रमुख ग्रह वृश्चिक राशीत असताना असा योग तयार झाला आहे. वृश्चिक राशीमध्ये या ग्रहांच्या संयोगाने तयार झालेला शक्तिशाली त्रिग्रही योग सर्व 12 राशींवर मोठा प्रभाव पाडणार आहे. विशेषत: 3 राशीच्या लोकांना याचा जास्त फायदा होईल. नेमका कोणत्या राशींसाठी हा त्रिग्रही योग अद्भूत ठरणार आहे? जाणून घेऊया.


त्रिग्रही योग बदलेल भाग्य


सिंह रास (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी हा त्रिग्रही योग अतिशय शुभ राहील. या लोकांना नवीन घर किंवा नवीन गाडीचा आनंद मिळू शकतो. नुकतेच मिळालेले पैसे तुम्हाला गुंतवणुकीसाठी प्रेरित करतील. तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. विशेषत: रिअल इस्टेट आणि मालमत्तेशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा नफा होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी काळ चांगला असणार आहे.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग खूप शुभ परिणाम देणारा ठरेल. या लोकांचं उत्पन्न चांगलं वाढेल. उत्पन्नात मोठी वाढ झाल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. कमाईचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. तुमच्यामध्ये आश्चर्यकारक आत्मविश्वास असेल. समाजातील तुमचा आदर वाढेल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होतील. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. 


कुंभ रास (Aquarius)


त्रिग्रही योग तयार झाल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम मिळतील. नोकरी असो वा व्यवसाय, नफा मिळणे निश्चित आहे. तुम्हाला तुमच्या सध्याच्या नोकरीमध्ये नवीन कामाची ऑफर किंवा पदोन्नती मिळू शकते. मोठी डील फायनल होण्याची शक्यता आहे. वाहन आणि मालमत्ता खरेदी करू शकता. बेरोजगारांसाठी काळ चांगला आहे. इच्छित रोजगार मिळेल. कार्यालयात सहकाऱ्यांशी चांगला समन्वय राहील. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Numerology: शनीची 'या' जन्मतारखेच्या लोकांवर असते असीम कृपा; कर्माप्रमाणे मिळतं फळ, नांदते श्रीमंती