Taurus October Monthly Horoscope 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर 2025 महिना लवकरच सुरु होणार आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे ऑक्टोबर महिना खूप खास असणार आहे. हा महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊयात.

Continues below advertisement


वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus October Monthly Horoscope 2025)


प्रेमाच्या बाबतीत तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर तिच्याविषयीच्या भावना या महिन्यात व्यक्त करा. तसेच, पार्टनरबरोबर चांगला संवाद साधाल. तुमच्या पार्टनरवर विश्वास ठेवायला शिका. तसेच, प्रामाणिकपणे काम करा. 


वृषभ राशीचे करिअर (Taurus October Monthly Horoscope 2025)


या महिन्यात तुमचं करिअर सामान्य असणार आहे. कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, तुमचे नियमित दिलेले टास्क पूर्ण करा. बॉसकडून तुमच्या कामाबाबत जो काही फिडबॅक मिळेल त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या. प्रमोशनच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होऊ शकतात. 


वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus October Monthly Horoscope 2025)


आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या महिन्यात पैशांच्या बाबतीत सांभाळून निर्णय घ्या. तसेच, पैशांची सेविंग करण्यासाठी तुमचा टार्गेट सेट करा. गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी करु नका. तसेच, सेविंग आणि रोजच्या वापराचे पैसे तो खर्च बाजूला काढून ठेवा. जेणेकरुन महिन्याच्या शेवटी तुम्हाला अंदाज येईल. 


वृषभ राशीचे आरोग्य (Taurus October Monthly Horoscope 2025)


आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला छोट्या मोठ्या समस्या जाणवू शकतात. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. तसेच, मन शांत ठेवण्यासाठी संगीत ऐका. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान भरपूर पाण्याचं सेवन करा. आरोग्याचं वेळोवेळी चेकअप करत राहा. 



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                                                                                    


Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य