Weekly Horoscope 29 September To 5 October 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आणि ऑक्टोबरचा पहिलाच आठवडा लवकरच सुरु होणार आहे. सध्या सगळीकडे शारदीय नवरात्रीची (Shardiya Navratri 2025) धामधूम पाहायला मिळतेय. तसेच, नवीन आठवड्यात काही महत्त्वाच्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, वैवाहिक स्थितीदेखील चांगली असणार आहे. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ दिसून येईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. तसेच, प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही काम करण्यास सक्षम असाल. या काळात नवीन वस्तू खरेदी करणं लाभदायक ठरेल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. तुमच्यात नवीन गोष्टी शिकण्याची उमेद दिसून येईल. तसेच, समाजात चांगला मान-सन्मान मिळणार आहे. प्रेमाच्या बाबतीत तुमचं नातं टिकून राहील. गैरसमज निर्माण होणार नाहीत. तसेच, व्यापारात नवीन वस्तू येतील. तुमच्या कामाचं कौतुक होईल मात्र या कौतुकाने भारावून जाऊ नका. मेहनत करण्याची तयारी हवीच. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत राहील. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जाण्याची संधी मिळू शकते. मित्रांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम दिसून येईल. यासाठी जास्त पैशांचा वापर करु नका. विनाकारण नवीन वस्तूंची खरेदी करु नका. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी सावधानता बाळगण्याची गरज आहे. ग्रहांच्या स्थितीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. यासाठी लांबचा प्रवास करणं टाळा. आणि त्वचेची तसेच, सांधेदुखीची काळजी घ्या. कामाचा जास्त ताण घेण्याची गरज नाही. तुमचं ज्या गोष्टीत मन रमतं ती गोष्ट करत राहा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. तुम्हाला भौतिक सुख सुविधांचा चांगला लाभ घेता येईल. तसेच, समाजात देखील तुमचं नाव प्रचलित राहील. मात्र, घरात वादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठी घरातील वातावरण जितकं शांत ठेवता येईल तितकं शांत ठेवा. तुमच्या जिभेवर आणि रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या काळात तुमच्याबरोबर अनेक चांगल्या वाईट घटना घडतील. मात्र, यातून तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. तसेच, तुमच्या भावनांचा आदर करा. कोणाशीही तुमच्या मनातील गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करु नका. ग्रहांच्या स्थितीचा या राशीवर शुभ परिणाम होणार आहे. त्यामुळे नवीन कार्याची सुरुवात करायला काहीही हरकत नसावी. पैशांची गुंतवणूक देखील लाभदायी ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :             

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑक्टोबरचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप