Taurus Monthly Horoscope November 2023: वृषभ (Taurus) राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर 2023 महिना चांगला जाणार आहे. मात्र, आरोग्याबाबत काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मात्र तुम्ही तणावमुक्त राहाल आणि तुमच्या कामाने तुमचा बॉस तुमच्यावर खुश असेल. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. परंतु या महिन्यात (Monthly Horoscope) तुम्ही गुंतवणूक करणं टाळावं, कारण शनिची दशम राशी तुमच्या सातव्या स्थानावर आहे, त्यामुळे गुंतवणुकीत नुकसान सहन करावं लागू शकतं.


वृषभ राशीच्या लोकांसाठी व्यवसायिक, शैक्षणिक आणि कौटुंबिकदृष्ट्या नोव्हेंबर महिना कसा असेल? हे सविस्तरपणे जाणून घेऊया.


वृषभ राशीचं नोव्हेंबरमधील व्यावसायिक जीवन


5 नोव्हेंबरपर्यंत बुधाचा अकराव्या भावात दोष असेल आणि 6 ते 26 नोव्हेंबरपर्यंत दुसऱ्या भावात दोष असेल, त्यामुळे या महिन्यात तुमच्या बाजूने होणारे व्यवहार लक्षात ठेवा


15 नोव्हेंबरपर्यंत सहाव्या भावात आणि 18 नोव्हेंबरपासून सप्तम भावात सूर्य-मंगळाची युती राहील, त्यामुळे तुम्ही अधिकाधिक वेळ बाजार निरीक्षण आणि व्यवसायात अधिक लाभासाठी संशोधनात घालवाल.


व्यवसायात भागीदार शोधत असाल, तर ज्योतिषाचा सल्ला घेऊनच भागीदारीत व्यवसाय करा, हे फायदेशीर ठरेल.


शनिची दशम राशी तुमच्या सातव्या स्थानावर असल्याने गुंतवणूक करणं टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं.


वृषभ राशीचं नोव्हेंबरमधील कौटुंबिक जीवन


नोव्हेंबर महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनात काही आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. वैवाहिक जीवनात आनंद आणि शक्ती वाढवण्यासाठी हा महिना चांगला राहील. भाऊ, बहिणी आणि कुटुंबातील सदस्यांशी जवळीक निर्माण होईल आणि एकमेकांना मदत होईल. 


वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांचं नोव्हेंबरमधील जीवन


विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण सुरू करायचं असेल तर या महिन्यात ते अवश्य करावं. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी त्यांच्या सेमिस्टर परीक्षेत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करू शकतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनाने तुमची चांगली प्रगती होईल.


वृषभ राशीचं नोव्हेंबरमधील आरोग्य आणि प्रवास जीवन


नोव्हेंबर महिन्यात वृषभ राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला रक्तदाब, तणाव, ताप यांसारख्या समस्या भेडसावू शकतात. या महिन्यात घरातील वडीलधाऱ्यांसोबत तीर्थयात्रेला जाणं तुमच्यासाठी सकारात्मक असेल आणि मनाला शांती देणारा हा प्रवास ठरेल.


वृषभ राशीच्या लोकांसाठी उपाय



  • जर तुमचा जमा झालेला पैसा सतत खर्च होत असेल तर 10 नोव्हेंबरला, म्हणजेच धनत्रयोदशीला पिंपळाची पाच पानं घेऊन पिवळ्या चंदनाने रंगवून वाहत्या पाण्यात सोडा.

  • धनत्रयोदशीच्या दिवशी कपडे, सोने, चांदी या वस्तू खरेदी करणं तुमच्यासाठी शुभ राहील. पण तेल, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका.

  • जर तुम्हाला इच्छा असूनही पैसे वाचवता येत नसतील तर 12 नोव्हेंबरला दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमळाच्या फुलाची पूजा करून लाल कपड्यात बांधून तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीत किंवा लॉकरमध्ये ठेवा. हे तुम्हाला आशीर्वादित ठेवेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Horoscope: दिवाळीनंतर ‘या’ राशींना अच्छे दिन; शनिच्या कृपेने होऊ शकतो प्रचंड धनलाभ