Taurus Horoscope Today 6 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत मॉर्निंग वॉक, योग आणि ध्यान यांचा समावेश करा, ज्यामुळे तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल. घरापासून दूर शिकणाऱ्या तरुणांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासेल. नोकरीत अधिकारी आनंदी राहतील. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. नोकरीत पदोन्नतीची संधी मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. जे लोक घरून ऑनलाईन काम करतात त्यांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. मुले क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते जिंकतील.
अधिकाऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
आज वृषभ राशीच्या लोकांच्या मेहनतीचे फळ कामाच्या ठिकाणी मिळेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील, त्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. राजकारणात तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल. अधिकारी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक करतील. आज काही लोकांमुळे तुम्हाला त्रासाला सामोरे जावे लागू शकते. मानसिकदृष्ट्या तुम्ही काहीसे अस्वस्थ राहू शकता, ज्यामुळे तुमची चिडचिडही होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या वैवाहिक जीवनाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिवसभर धावपळ सुरू राहील आणि आज प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. मेहनतीचे फळ मात्र चांगले मिळेल.
वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन
आज कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील. घरच्यांकडबन तुमचं कौतुक होईल. तसेच, आज वडीलधारी मंडळींकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवल्या जातील त्या तुम्ही पूर्ण करा.
आज वृषभ राशीचे आरोग्य
आरोग्य चांगले राहील, पण तरीही मनात असे वाटेल की तुम्ही गंभीर आजारी आहात किंवा तुम्हाला काही मोठी समस्या निर्माण होणार आहे. मानसिक भ्रम राहील.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
पिंपळाच्या झाडाची पूजा करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :