Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरज चोप्राने नव्या हंगामाची सुरुवात दणक्यात केली आहे. दोहा येथे सुरु असलेल्या डायमंड स्पर्धेवर नीरज चोप्राने नाव कोरलेय. दोहा येथील कतार स्पोर्ट्स क्लबमध्ये झालेल्या स्पर्धेत नीरज चोप्रा याने बाजी मारली. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर दूर भाला फेकला. टोक्यो ऑलम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा जॅकब वडलेज्च दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय. ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स तिसऱ्या स्थानावर राहिलाय.  गेल्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या अँडरसन पीटर्स यानेच नीरज चोप्राचा पराभव करत गोल्ड जिंकले होते. आता नीरज चोप्राने हा हिशोब चुकता केलाय.  
 






या कामगिरीनंतर नीरज चोप्रावर क्रीडा विश्वातून कौतुकाचा पाऊस पडत आहे. नेटकरी नीरज चोप्रा याचे अभिनंदन करत आहेत. सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत सर्वजण नीरज चोप्राचे अभिनंदन करत आहेत. 






दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राचे प्रदर्शन


पहिला प्रयत्न - 88.67 मीटर 
दूसरा प्रयत्न  - 86.04 मीटर 
तिसरा प्रयत्न - 85.47 मीटर 
चौथा प्रयत्न - x 
पांचवा प्रयत्न - 84.37 मीटर 
सहावा प्रयत्न - 86.52 मीटर 


दोहा डायमंड लीगची अंतिम आकडेवारी


1. नीरज चोप्रा (भारत) - 88.67 मीटर 
2. जॅकब वडलेज्च (चेक गणराज्य) - 88.63 मीटर 
3. अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा) - 85.88 मीटर  
4. जूलियन वेबर (जर्मनी) - 82.62 मीटर 
5. अँड्रियन मर्डारे (मोल्डोवा) - 81.67 मीटर 
6. केशोर्न वाल्कॉट (त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो) - 81.27 मीटर  
7. रोड्रिक जी. डीन (जापान) - 79.44 मीटर 
8. कर्टिस थॉम्पसन (यूएसए) - 74.13 मीटर 


रौप्य पदक पटकावताना झाली होती दुखापत 


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरजला दुखापत झाली होती. यामुळं त्याल्या बर्मिंगहम कॉमनवेल्थ स्पर्धेत खेळता आले नव्हता. आता डायमंड लीग स्पर्धा जिंकून नीरज चोप्रा याने दमदार पुनरागमन केलेय.