Taurus Horoscope Today 21st March 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खास आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील, परंतु तुम्हाला तुमचे काम प्रामाणिकपणे पूर्ण करावे लागेल. महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना तुम्हाला सतर्क राहावं लागेल. आज तुमचा दिवस जेवढा चांगला तेवढाच आव्हानात्मक असणार आहे.
तुमच्या प्रियकराला समजून घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमच्या नात्यात (Relationship) दुरावा येऊ शकतो. तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतही काही खटके उडण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या मुलाकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांचा अभिमान वाटेल. कुटुंबाचं सहकार्य (Family Support) मिळेल. कुटुंबातील सदस्य तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकता.
पैशांचे व्यवहार टाळा
वृषभ राशीचा (Taurus Horoscope) आजचा दिवस करिअरच्या दृष्टीने संमिश्र आहे. आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळण्याबाबत शंका आहे. व्यवसाय किंवा नोकरीच्या बाबतीत आज कोणताही नवीन प्रयोग करू नका. कोणतेही नवीन निर्णय घेऊ नका. कारण आज तुमच्या व्यावसायिक योजना यशस्वी होणार नाहीत. तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. आज तुम्हाला कुठूनही नोकरीची ऑफर आली तर आधी सर्व माहिती जाणून घ्या, मगच नोकरी स्वीकारा. आज तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैशांचे व्यवहार टाळावे लागतील. कोणालाही कर्ज किंवा उधार देऊ नका. गुंतवणूक करण्याआधी मित्राचा किंवा जवळच्या नातेवाईकांचा सल्ला घ्या.
आरोग्याची काळजी घ्या
राजकारणात सक्रिय असणाऱ्या लोकांना आज यश मिळेल. मोठ्या नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील. सर्दी, खोकल्यासारखी लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आज मित्र भेटायला तुमच्या घरी येतील.
आज वृषभ राशीचे आरोग्य
वृषभ राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची समस्या असू शकते. हृदयरोगाचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या औषध आणि आहाराबाबत गाफील राहू नये.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी सात मंगळवारपर्यंत गणपतीला लाडू अर्पण करा. यामुळे कुंडलीत स्थितीही चांगली राहील.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या: