Taurus Horoscope Today 11th March 2023 : वृषभ राशीचा (Taurus Horoscope) आजचा दिवस चांगला जाईल. समाजात तुमचा सन्मान वाढेल. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. तुमच्या मालमत्तेबाबत खूप काळजी घ्या. तुमच्या पदोन्नतीची शक्यता आहे. यामध्ये तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. तुम्हाला अधिकार्यांचे सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही दिलेली कामे चांगल्या प्रकारे करू शकाल. कोर्ट कचेरीशी संबंधित कामे वेळेत पूर्ण होतील. नवीन वाहनाचा आनंद मिळेल.
जे लोक कामानिमित्त कुटुंबियांपासून दूर आहेत त्यांना आज घरच्यांची आठवण येईल. जे विद्यार्थी स्पर्धेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम करतायत त्यांना यश मिळेल. आज तुमच्या जुन्या मित्रालाही भेटण्याचा योग आहे. यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.
व्यवसायात पुढे जाण्याची संधी मिळेल
आज तुम्ही स्वतःबरोबरच कुटुंबातील सदस्यांसाठीही खरेदी करा. यामुळे घरातील प्रत्येकजण आनंदी राहील. व्यवसायात नवीन प्रयोग केल्याने पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रगतीसाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
आज वृषभ राशीचे आरोग्य :
आज तुमचं आरोग्य चांगलं राहील, पण तरीही तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय :
शनी बीज मंत्राचा जप करा आणि उडदाची खिचडी बनवून संपूर्ण कुटुंबासोबत खा.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :