Taurus Horoscope Today 09th March 2023 : वृषभ राशीसाठी (Taurus Horoscope) आजचा दिवस चांगला असणार आहे. कुटुंबात आज सगळे एकत्र, एकोप्याने काम करताना दिसतील. जोडीदाराचा आज पूर्ण पाठिंबा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वरिष्ठांच्या मदतीने नवीन कामाला सुरुवात करू शकता. नोकरदार लोकांच्या कामात प्रगती होईल त्यामुळे ते खूप आनंदी असतील.
आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर द्यायचेच असतील तर देणाऱ्याकडून ते पैसे कधी परत करणार हे वदवून घ्या. कौटुंबिक समस्यांचा तुम्हाला त्रास होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने घरातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीशी अचानक भेट झाल्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल.नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. मुलांची प्रगती होईल. आध्यात्मिक गोष्टींत मन गुंतेल.
पैसे जपून वापरा
जर तुम्ही आज खरेदीसाठी बाहेर गेलात तुमचं बजेट लक्षात घेऊन सर्व खरेदी करा. जेणेकरून जास्त पैसे खर्च होणार नाहीत. तुमचा जोडीदार अलीकडच्या काळातील मतभेद विसरून आपला चांगला स्वभाव दाखवेल. तुमच्या घरातील एखादा सदस्य आज तुमच्याशी प्रेमाशी संबंधित कोणतीही समस्या शेअर करू शकतो, तुम्ही त्यांना योग्य सल्ला द्यावा.
आज वृषभ राशीचे आरोग्य
आज वृषभ राशीचे आरोग्य पाहता तुम्हाला कान दुखणे किंवा इन्फेक्शन सारखी समस्या असू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय
विष्णु सहस्त्रनाम पाठ करणे लाभदायक ठरेल. मंदिरात जाऊन पांढरे धान्य दान करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :