Taurus Horoscope Today 07th March 2023 : वृषभ राशीसाठी (Taurus Horoscope) आजचा दिवस संमिश्र असणार आहे. जर व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही तुमच्या राहिलेल्या योजना पुन्हा सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचे झाल्यास, विद्यार्थी क्रीडा स्पर्धेची तयारी करताना दिसतील, यामध्ये ते जिंकूदेखील शकतील. शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आजच्या दिवशी तुमचा सन्मान आणि आदर वाढेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना रोजगार मिळेल, असे संकेत आहेत. संतती सुखात वाढ होईल. तुमच्या मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल.
विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, शिक्षकांचे सहकार्य मिळेल. आज तुमचा मान-सन्मान वाढेल. बदलत्या हवामानामुळे आज तुम्हाला खूप वेगळे वाटेल, त्यामुळे तुम्ही तुमची कामे उद्यासाठी पुढे ढकलू शकता. नोकरदार लोक त्यांच्या नोकरीत बदल पाहू शकतात, ज्यामुळे ते थोडे आनंदी, थोडे दुःखी दिसतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना आज रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत.
संतती सुखात वाढ होईल. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या प्रकृतीबद्दल तुम्ही थोडे चिंतेत दिसाल, त्यासाठी तुम्ही डॉक्टरांशी बोलाल. आज तुम्ही अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. प्रवासा दरम्यान वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. आजचा दिवस कुटुंबासमवेत घालवाल आणि पैसे कसे वाचवायचे ते शिकाल, जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यात पैसे वाचवू शकाल.
वृषभ राशीचे आजचे आरोग्य :
होळीच्या निमित्ताने जेवणावर थोडं नियंत्रण ठेवावं लागेल. गोड पदार्थ, मिठाई मर्यादित प्रमाणात खा. आहाराची योग्य काळजी घ्या. तसेच, अन्नातील पोषक घटकांचे प्रमाण वाढविण्यासोबतच जास्तीत जास्त पाणी पिण्यावर भर द्या.
वृषभ राशीसाठी आजचे उपाय :
आज पांढरे धान्य दान करा. होलिका दहनाच्या आधी गूळ आणि बार्ली आगीत टाका. होलिकेला नमस्कार करून प्रदक्षिणा घाला.
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग :
वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तसेच, आजच्या दिवशी तुमचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :