Dream Astrology : स्वप्न पडणं हे खूप सर्वसाधारण आहे. आपल्यापैकी साधारण सर्वच जणांना वेगवेगळी स्वप्नं पडतात. अनेकदा ही स्वप्नं काही ना काही सूचित करत असतात. काही स्वप्नं ही शुभ संकेत देत असतात. तर, काही स्वप्नं पाहिल्यानंतर आपल्याला भीती वाटू लागते, म्हणजेच त्यावेळी ते काही अशुभ संकेत देत असतात. पहाटे पडलेली स्वप्नं ही सत्यात उतरतात. शास्त्रानुसार, स्वप्नात काही प्राणी दिसणं हे अत्यंत शुभ समजलं जातं


स्वप्नात मोर दिसणे


स्वप्न शास्त्रानुसार जर तुम्हाला स्वप्नात मोर दिसला तर हे खूप शुभ चिन्ह आहे. याचा अर्थ असा की, येत्या काही दिवसांत तुम्हाला जीवनात सुख-समृद्धी मिळणार आहे आणि तुम्हाला काही मोठी संधी मिळणार आहे. जर तुम्ही शनिदेवाला मोरावर बसलेलं पाहिलं तर तुमच्या नशिबाला चार चाँद लागतात, याचाच अर्थ येत्या काही दिवसांत तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. तसेच काही महत्त्वाचे काम करता येईल.


स्वप्नात नीलकंठ दिसणे


नीलकंठ पक्षी स्वप्नात दिसणं शुभ मानलं जातं. अविवाहित लोकांना स्वप्नात नीलकंठ पक्षी दिसणं हे खूप शुभ लक्षण आहे. याचा अर्थ, तुम्हाला लवकरच तुमचा जीवनसाथी मिळेल. तसेच, तुम्ही एकटे असाल तर तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकतं.


स्वप्नात हंस दिसणे


स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात हंस दिसणं देखील खूप शुभ असतं. याचा अर्थ, तुम्हाला येत्या काळात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुमची काही महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात.


स्वप्नात सिंह दिसणे


जर तुम्हाला स्वप्नात सिंह दिसला तर हे शुभ संकेत आहे. म्हणजे तुमची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत, कोर्टात एखादी केस सुरू असेल तर या केसमध्ये विजय निश्चित आहे. तुमचं धैर्य आणि शौर्यही वाढेल.


स्वप्नात गाय दिसणे


स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात गाय दिसणं शुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ, येत्या काळात तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. तुम्हाला संपत्ती देखील मिळू शकते. करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Astrology : तब्बल 17 वर्षांनंतर यम ग्रहाचा शनीच्या राशीत प्रवेश; 3 राशी जगणार राजासारखं जीवन, नोकरीत प्रमोशनसह पगारवाढीचे योग