Swapna Shastra : स्वप्नशास्त्रानुसार, (Swapna Shashtra) असं म्हणतात की, माणूस ज्या परिस्थितीतून जात असतो, त्याला तशी स्वप्ने पडतात. स्वप्ने आपल्या जीवनातील परिस्थितींवर प्रभाव टाकू शकतात. स्वप्ने आपल्या जीवनाचा आरसा असतो. स्वप्नशास्त्राचे तज्ज्ञ म्हणतात की, अशी काही स्वप्ने असतात, ज्यांचा एखाद्या व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडतो. आपण अनेकदा पाहिलेली स्वप्ने आपल्या प्रियजनांसोबत किंवा मित्रांसोबत शेअर करतो. पण, त्या स्वप्नाचे अर्थ आपल्याला कळत नाही. प्रत्येक स्वप्न तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगू नये. जी स्वप्ने तुम्हाला आर्थिक लाभ देतात, ती स्वप्ने जर आपण कोणाला सांगितली तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. कोणती स्वप्ने शेअर करू नयेत हे जाणून घ्या
ही स्वप्ने चुकूनही कोणाला सांगू नका
स्वप्नात आई-वडिलांना पाणी देणे
स्वप्न शास्त्रानुसार, जर तुम्ही स्वप्नात तुमच्या आई-वडिलांना पाणी देत असाल तर हे स्वप्न दाखवते की भविष्यात तुमची प्रगती होईल. आणि जर तुम्ही असे स्वप्न कोणासोबत शेअर केले तर तुमच्या प्रगतीला बाधा येण्याची शक्यता आहे.
फळबागा पाहिल्यास..
जर स्वप्नात तुम्हाला फळांची बाग दिसली. तर स्वप्नशास्त्रानुसार, या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते जी आर्थिक लाभ दर्शवते. स्वप्न शास्त्रानुसार असे स्वप्न सांगल्याने लाभाऐवजी नुकसान होते.
चांदीचा कलश
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात चांदीचा कलश दिसला तर याचा अर्थ तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा आहे. अशा प्रकारचे स्वप्न सूचित करते की, आगामी काळात तुमच्यासाठी चांगले दिवस आहेत. अशी स्वप्ने इतरांना सांगितले तर, घरी आलेली लक्ष्मी माघारी फिरते.
स्वप्नात देव पाहणे
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात देव दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की, तुम्हाला लवकरच तुमच्या नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळेल. असे स्वप्न कोणाला सांगू नये, अन्यथा हाती आलेली संधी परत जाऊ शकते.
प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ
प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो. काही स्वप्ने माणसाच्या लक्षात राहतात तर काही स्वप्ने सकाळी उठल्यावर विसरली जातात. ज्या लोकांना त्यांची स्वप्ने आठवतात त्यांचा अर्थ जाणून घेण्यात खूप रस असतो. स्वप्न शास्त्रामध्ये प्रत्येक स्वप्नाचे वर्णन केले आहे. ही स्वप्ने आपल्याला भविष्यातील घडामोडींची माहिती देतात. जर तुम्हालाही वारंवार सरडे पाहण्याची स्वप्ने पडत असतील तर ते अशुभ लक्षण असू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)
महत्वाच्या बातम्या :
Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ