Surya Shani Yuti Impact Astrology : फेब्रुवारीत अचानक उष्णता झपाट्याने वाढली आहे, आतापासूनच उष्मा वाढू लागला असून सूर्यदेवाचा जणू कोप होत आहे, असे वाटत आहे, पृथ्वीवरील थंडी आणि उष्णतेचे कारण ग्रहांचा राजा असलेल्या सूर्यदेवाला मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, सुर्याचा राग वाढला म्हणजे पारा वाढला, जेव्हा ते शांत असतील तेव्हा पारा घसरेल आणि लोकांना थंडावा मिळेल. परंतु यावर्षी ग्रहांची स्थिती अशी झाली आहे की, सूर्यदेव आधीच कोपला आहे, त्यामुळे उष्णतेत झपाट्याने वाढ होत आहे. जाणून घ्या ज्योतिष तज्ज्ञांचे मत काय आहे?
शनिदेवाचे कुंभ राशीत आगमन, सूर्याची वाढली तीव्रता
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि शनीच्या युतीचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होत आहे, तसेच देशाचे हवामान आणि जगावरही त्याचा परिणाम होतो असे म्हटले जाते. कुंभ राशीत सूर्य आणि शनीच्या संयोगामुळे वातावरणात वेळेआधीच जास्त उष्णता वाढली आहे, असे ज्योतिषांचे मत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षाच्या सुरुवातीलाच कुंभ राशीत शनिदेवाचे आगमन झाल्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी सूर्यदेव कुंभ राशीत शनिसोबत फिरत आहे. एक प्राचीन कथा आहे की, जेव्हा सूर्यदेव शनिदेवावर कोपून कुंभ राशीत आले तेव्हा त्यांनी शनीच्या घरातील कुंभ जाळले. कुंभ राशीतील सूर्याचे शनीच्या बरोबरीने होणारे संक्रमण सूर्याची तीव्रता वाढविण्याचे काम करते. त्यामुळेच यंदाच्या फेब्रुवारीपासून वातावरण उष्ण आहे.
कुंभ राशीत शनीचा प्रभाव
कुंभ राशीतील शनीचा हा सर्वात मोठा गुण आहे की, तो अशा घटना घडवतो ज्यामुळे लोकं आश्चर्यचकित होतात. ज्योतिषवाणीनुसार, या वर्षी कुंभ राशीत शनीच्या प्रभावामुळे देशाच्या अनेक भागांत वालुकामय आणि वादळी वारेही वाहतील. काही नवीन प्रकारचे रोग जनतेला त्रास देऊ शकतात. काही जुने रोग देखील नवीन स्वरूपात परत येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार, यापूर्वी 1993 मध्ये जेव्हा शनि कुंभ राशीत आला होता, तेव्हाही जगात एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. त्या वर्षात राजकारणात ऐतिहासिक घटना घडल्या. त्या वर्षी मुंबईत एकापाठोपाठ एक बॉम्बस्फोट झाले. बाबरी मशिद प्रकरणामुळे देशात विचित्र वातावरण निर्माण झाले होते. तर त्या वर्षीच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. पण शनीने असा विचित्र योगायोग घडवला की कमी जागा मिळूनही मुलायम सिंह यांनी इतिहास रचला आणि बसपासोबत सरकार स्थापन केले.
एप्रिलमध्ये सूर्य आणि गुरू मेष राशीत एकत्र येतील
या वर्षी एप्रिलमध्ये गुरू मेष राशीत येणार असून, या महिन्यात सूर्यही मेष राशीत प्रवेश करेल आणि गुरूला भेटेल. सूर्य आणि गुरु हे दोन्ही ग्रह अग्नि तत्वाचे मानले जातात. अशा स्थितीत अग्नि तत्वाच्या राशीत सूर्य आणि गुरू या दोन ग्रहांची युती झाल्याने यंदाही तीव्र उष्णता वाढणार असून एप्रिल-मे महिन्यात उकाड्यामुळे लोक त्रस्त होणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Astrology : ब्रेकअपला जबाबदार असतो पत्रिकेतील 'हा' ग्रह दोष, प्रेमसंबंधात येतो दुरावा, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या