Love Astrology : एखाद्याच्या प्रेमात पडणे ही जगातील सर्वोत्तम भावना आहे. पण काही काळानंतर छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भांडणे, गैरसमज, वाद आणि नंतर नात्यात ब्रेकअप होते. दोन प्रेमीयुगुल अचानक वेगळे होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, दोन प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये ब्रेकअप झाले तर त्यासाठी तुम्ही जबाबदार असालच असे नाही. कधी-कधी तुमच्या पत्रिकेतील ग्रह-नक्षत्राची स्थिती बदलून एखादी छोटीशी गोष्ट नात्यात दुरावा आणते. जाणून घ्या कुंडलीत कोणते ग्रह दोष आहेत, ज्यामुळे नात्यात ब्रेकअप होतो.
जन्मपत्रिकेतील या स्थितीमुळे होते ब्रेकअप
ज्योतिषशास्त्रानुसार जर कुंडलीत 7वा स्वामी पीडित असेल तर असे लोक प्रेम करतात, पण त्या प्रेमाला लग्नापर्यंत नेण्यात अयशस्वी ठरतात. अथक प्रयत्न करूनही अशा प्रेमी युगुलांना प्रेमविवाहात यश मिळत नाही. अशा परिस्थितींमुळे नात्यात ब्रेकअप होते.
कुंडलीतील या स्थितीमुळे प्रेम जीवनात वादविवाद होतात.
जन्मकुंडलीतील सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या भावात पंचम स्वामी आणि सप्तम स्वामी दोन्ही असतील, तर अशा व्यक्तीला काही प्रमाणात प्रेमप्रकरणात यश मिळते, परंतु तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकत नाही. अशा परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होतात आणि शेवटी ब्रेकअप होते.
कुंडलीतील या स्थानावरून प्रेमात फसवणूक
जर कुंडलीत पंचम आणि सप्तम दोन्ही स्वामी पीडित असतील. तर अशा व्यक्तीची फसवणूक होते आणि तो प्रेमात अयशस्वी होतो. दुसरीकडे, मंगळ, सूर्य आणि शनि यापैकी कोणतेही ग्रह उच्च राशीत असतील, तर उच्च राशीतून त्यांची दृष्टी पाचव्या भावात आणि सातव्या भावात पडल्यास प्रेमात असलेल्या जोडीदारांसाठी ते चांगले नाही. कुंडलीतील या स्थितीमुळे ब्रेकअप होते.
कुंडलीतील या स्थितीमुळे लव्ह लाईफ होते अयशस्वी
ज्योतिषशास्त्र जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सप्तम स्वामी असल्यामुळे शुक्र पिडीत असेल, तर अशा व्यक्तीला प्रेम जीवनात यश मिळत नाही. अशा लोकांचे प्रेम एकतर्फी असते आणि ते गंभीर नातेसंबंधात राहू शकत नाहीत. दुसरीकडे, जर राहू आणि केतूचा प्रभाव पाचव्या घराच्या स्वामीवर असेल तर चांगले संबंध तुटतात.
अशा परिस्थितीत समस्या सुरू होतात
जर कुंडलीत राहू, केतू आणि चंद्राचा योग असेल तर प्रेम जीवनात अडचणी येऊ लागतात. चंद्राच्या या स्थितीमुळे विचार बदलू लागतात. अशा परिस्थितीत ब्रेकअप खूप लवकर होते. याउलट कुंडलीत सहाव्या, आठव्या आणि बाराव्या भावात चंद्र कमजोर स्थितीत असेल तर अशा स्थितीत ब्रेकअपही होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Chanakya Niti : प्रेमच आहे प्रत्येक नात्याचा आधार! व्हॅलेंटाईन डे निमित्त चाणक्यांची 'ही' गोष्ट ज्याला समजली, त्याने जग जिंकलेच समजा!