Surya Shani Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहांमध्ये सूर्य (Sun) आणि शनी (Shani Dev) असे दोन ग्रह आहेत ज्यांची कृपा जर एखाद्या राशीवर पडली तर त्या राशीचं भाग्य रातोरात बदलतं. त्यानुसार, आज सूर्य आणि शनीची युती जुळून आली आहे. याचा 12 राशींवर वेगवेगळा परिणाम होणार आहे. मात्र, 3 राशींवर खास सूर्य आणि शनीची कृपादृष्टी बरसणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणू घेऊयात. 


वैदिक पंचांगानुसार, सध्या शनी ग्रह कुंभ राशीत विराजमान आहे. शनी ग्रह 29 मार्च 2025 रोजी मीन राशीत प्रवेश करणार आहे. तर, 12 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 10 वाजून 03 मिनिटांनी सूर्याद्वारे कुंभ राशीत प्रवेश होणार आहे. 


मेष रास (Aries Horoscope)


मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य-शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या लोकांना नोकरी, शिक्षण, व्यवसायात चांगलं यश मिळेल. तसेच, धनसंपत्तीत कोणतीच कमतरता भासणार नाही. तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. तसेच, पती-पत्नीच्या नात्यातील तणाव दूर होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारेल. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन चांगलं रमेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. 


सिंह रास (Leo Horoscope)


सूर्य-शनीची युती सिंह राशीच्या लोकांसाठी फार चांगला असणार आहे. आज तुमच्या हातात एखादं चांगलं काम लागेल. त्यामुळे तुम्ही फार प्रसन्न असाल. तुम्हाला समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमची मानसिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फार चांगला ठरणार आहे. सूर्य-शनीच्या कृपेने तुम्हाला चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. तसेच, पती-पत्नीतील नातं अधिक घट्ट होईल. तुमच्या व्यवसायात चांगली वाढ झालेली दिसेल. कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नका. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :                            


Horoscope Today 12 January 2025 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य