Surya Shani Yuti: 2025 वर्ष (2025 Year) आता संपण्याच्या मार्गावर आहे. या वर्षातील 12 वा महिना म्हणजे डिसेंबर (December 2025) महिना आता सुरू आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 2025 वर्ष हे जाता जाता काही राशींना मालामाल करणार आहे. कारण या महिन्यात अनेक ग्रह-नक्षत्र राशी परिवर्तन तसेच संक्रमण करत आहेत. 17 डिसेंबरपासून सूर्य-शनिची युती ही पॉवरफुल केंद्र दृष्टी योग निर्माण करत आहे. सूर्य आणि शनि एकमेकांपासून अंदाजे 90 अंशांवर स्थित असतील. ज्यामुळे 5 राशींचं भाग्य फळफळणार आहे. कोणत्या राशी मालामाल होणार? जाणून घ्या...
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य स्वतः सिंह राशीचा स्वामी आहे, म्हणून हा योग त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी असेल. आदर आणि सन्मान वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महत्त्वाचे निर्णय यशस्वी होतील. व्यावसायिकांना पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळू शकेल.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीची अनुकूल बाजू तूळ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देईल. या काळात अडकलेल्या निधीची वसुली शक्य आहे. नवीन व्यावसायिक भागीदारीच्या संधी निर्माण होतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळू शकेल. कुटुंबात सतत तणाव असेल तर त्यातही सुधारणा होईल.
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनू राशीच्या लोकांसाठी, ही युती प्रगतीची चिन्हे घेऊन येते. करिअरमध्ये मोठे बदल दिसून येतील. परदेशाशी संबंधित कामात फायदा होईल. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनात गुंतलेल्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे.
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, शनि कुंभ राशीचा स्वामी आहे, म्हणून ही युती त्यांच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम आणेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसाय विस्तार शक्य आहे. कुटुंबात सुसंवाद आणि आनंद राहील. कुंभ राशीच्या लोकांनी या वेळेचा पुरेपूर फायदा घ्यावा.
हेही वाचा
Budh Transit 2025: 29 डिसेंबरपर्यंत 3 राशींची प्रगती जराही थांबणार नाही! बुध ग्रहाचे भ्रमण, बॅंक-बॅलेन्स, पैसा दुप्पट करणार, कोणत्या राशी मालामाल?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)