Samsaptak Yog : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर परिवर्तन करतात. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. ग्रहांचं राशी परिवर्तन अनेक राशींचं नशीब उजळतं तर काही लोकांच्या जीवनात आनंद येतो. ग्रहांचा राजा सूर्य एका ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो. यावेळेला सूर्य हा सर्वात बलशाली ग्रह आहे. कारण सूर्य (Sun) हा आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत विराजमान आहे. तसेच, सूर्याची दृष्टी शनीवर पडतेय. यामुळे काही राशींच्या लोकांचं नशीब उजळणार आहे. सूर्याची दृष्टी शनीवर पडल्याने कोणत्या राशीच्या (Zodiac Signs) लोकांना लाभ मिळेल ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरेल. तुमच्यासाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तसेच, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीच्या संधी मिळतील. ग्रहांचा राजा सूर्य तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर करतील. सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आनंद येईल. कोणतेही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ मंडळींचं मत घ्या.
वृषभ रास (Taurus Horoscope)
सूर्यदेव तुमच्या चौथ्या चरणात दहाव्या भावात विराजमान आहे. त्यामुळे सूर्य आणि शनीच्या संयोगाने समसप्तक योग जुळून येणार आहे. या काळात तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या लवकरच दूर होतील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. अनेक दिवसांपासून तुमची कोर्ट कचेरी संदर्भातील रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या बरोबर नशिबाची साथ असल्या कारणाने पैसा तुमच्याकडे येईल. पण, या पैशांचा योग्य वापर करा. अन्यथा फायद्या ऐवजी तुम्हाला नुकसान सहन करावं लागेल.
तूळ रास (Libra Horoscope)
सूर्य या राशीच्या एकादश भावात अकराव्या स्थानी विराजमान आहे. त्याचबरोबर, शनी पंचम भाव देखील जुळून आला आहे. त्यामुळे या काळात समसप्तक योग जुळून आला आहे. या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेणं गरजेचं आहे. उच्च शिक्षणाच्या अनेक संधी आहेत. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :