Surya Grahan 2022 : यंदाच्या दिवाळीची (Diwali 2022) सुरुवात 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जे अमावस्या तिथीच्या दिवशी होते. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. 2022 सालातील शेवटचे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे. तसेच, या वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण आहे. पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी झाले होते.
या राशीत होणार सूर्यग्रहण 2022 :
धार्मिक दृष्टिकोनातून सूर्यग्रहणाला विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 25 ऑक्टोबरला हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार आहे. तूळ राशीमध्ये सूर्य दुर्बल मानला जातो. त्यामुळे ते अशुभ परिणाम देतात. पंचांगानुसार यावेळी सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यासोबतच चंद्र, शुक्र आणि केतू देखील तूळ राशीमध्ये बसतील. या कारणामुळे तूळ राशीमध्ये चतुर्ग्रही योगही तयार होईल. याशिवाय राहुचीही या चार ग्रहांवर थेट नजर असेल आणि शनीचीही नजर असेल. यामुळे, या सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम बहुतेक राशींवर पडतील, परंतु या 3 राशींना विशेषतः त्रास होईल.
मिथुन : सूर्यग्रहणाच्या प्रभावामुळे मिथुन राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती बिघडू शकते. कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतील. जोडीदारामध्ये मतभेद होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल नाही. यामध्ये गुंतवणूक न केल्यास चांगले होईल. नोकरी आणि व्यवसायात घट होऊ शकते.
तूळ : हे सूर्यग्रहण तूळ राशीत होत असल्याने चतुर्ग्रही योगही तयार होत आहे. त्यामुळे या लोकांसाठी हे सूर्यग्रहण अत्यंत अशुभ ठरू शकते. सर्व बाजूंनी तणाव येऊ शकतो, अपघात किंवा दुखापत देखील होण्याची शक्यता आहे.
मकर : या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. नोकरी आणि व्यवसायात नुकसान होऊ शकते. गुंतवणूक करू नका. या काळात नोकरी बदलू नका. कोणताही मोठा निर्णय न घेणेच चांगले.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्वाच्या बातम्या :