Surya Grahan 2026 : वैदिक पंचांगानुसार, सूर्यग्रहणाचा (Surya Grahan 2026) प्रभाव मानवासह देशभरात पाहायला मिळतो. त्यानुसार, आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी ठीक 03 वाजून 26 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 5 वाजून 40 मिनिटांनी संपणार आहे. तर, ग्रहण काळ संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी संपणार आहे. या सूर्यग्रहणाचा एकूण काळ 4 तास 32 मिनिटांचा असणार आहे.
सूर्यग्रहणाच्या काळात खाण्या-पिण्याशी संबंधित मान्यता
- सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. या काळात खाण्या-पिण्यास मनाई केली जाते.
- ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्यग्रहणाच्या काळात गर्भवती महिलांनी चाकू, सुरी, कैची किंवा सुईसारख्या कोणत्याही धारदार वस्तूंचा वापर करु नये.
- तसेच, सूर्यग्रहणाचा काळ सुरु होण्यापासून ते सूर्यग्रहण संपेपर्यंत भोजन करणं वर्जित मानलं जातं.
- जे लोक वृद्ध आहेत, आजारी आहेत अशा लोकांनी ग्रहण काळात उपवास करु नये.
- जर तुम्हाला भूक लागली तर तुम्ही सुकामेवा खाऊ शकता. जरी तुम्ही कमी प्रमाणात याचं सेवन केलं तरी तुमचं पोट भरलेलं राहील.
- महिलांना ग्रहणकाळात सात्विक भोजन घेण्याचा सल्ला दिला जातो.
- असं म्हणतात की, या कालावधीत तुम्ही पाण्याचे काही थेंब किंवा तुळशीची पाने उकळून पाण्यात घालून ती पिऊ शकता.
भारतात सूतक काळ असेल?
आज होणारं सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. वैदिक शास्त्रानुसार, ग्रहण जिथे दिसतं तिथेच त्याचे परिणाम जाणवतात. त्यामुळे, या ग्रहणासाठीचा सुतक काळ भारतात वैध राहणार नाही. इथे ग्रहण दिसणार नसल्यामुळे, याचा अर्थ असा की मंदिरं बंद राहणार नाहीत, खाणं-पिणंही सामान्य राहील आणि कोणतेही विशेष नियम पाळावे लागणार नाहीत. गर्भवती महिलांनाही काळजी करण्याची गरज नाही.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
