Surya Grahan 2026 : लक्ष्मी-नारायण राजयोग, बुधादित्य राजयोग आणि...सूर्यग्रहणादरम्यान 'या 3 राशींचा गोल्डन टाईम सुरु; जगाल राजासारखं आयुष्य
Surya Grahan 2026 : आज 2026 वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसलं तरीही त्याचा या 3 राशींना मात्र पुरेपूर लाभ मिळणार आहे.

Surya Grahan 2026
1/9
ज्योतिष शास्त्रामध्ये सूर्यग्रहणाला शुभ मानलं जात नसलं तरीही हे सूर्यग्रहण काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे.
2/9
वर्षभरात अनेक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होतात. हे सूर्यग्रहण वर्षाचं पहिलं सूर्यग्रहण असणार आहे आणि हे ग्रहण कंकणाकृती असणार आहे.
3/9
ज्योतिष शास्त्रानुसार, हे सूर्यग्रहण शनीच्या अधिपत्याखाली कुंभ राशीत असणार आहे. तसेच, या कालावधीत अनेक राजयोगसुद्धा जुळून येणार आहेत.
4/9
या दिवशी बुधादित्य राजयोग, लक्ष्मीनारायण राजयोग, शुक्रादित्य राजयोग, आणि चंद्र-मंगळ युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल.
5/9
या राजयोगांमुळे 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार आहे. त्यांना या ग्रहणामुळे पुरेपूर लाभ घेता येणार आहे. जाणून घ्या कोणत्या राशींना विशेष लाभ मिळेल.
6/9
मकर रास : या सूर्यग्रहणामुळे तुम्हाला व्यवसायात किंवा कामात प्रगती मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील आणि आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.
7/9
मिथुन रास : तुमच्यासाठी हे सूर्यग्रहण सकारात्मक असणार आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढतील, आत्मविश्वास वाढेल, कुटुंबात प्रेम वाढेल, व्यवसायिकांना आर्थिक लाभ मिळेल.
8/9
सिंह रास : हे सूर्यग्रहण आणि जुळून आलेले राजयोग तुम्हाला पुरेपूर लाभ मिळवून देणारे असेल. या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, नोकरीच्या अनेक संधी मिळतील, गुंतवणुकीतून फायदा मिळेल.
9/9
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 17 Feb 2026 10:45 AM (IST)